फिर सुबह होगी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2018   
Total Views |

 

 
 
 
 
 
२०१८ आज संपत असले तरी सकाळ उजाडणार आहे. आजची सायंकाळ भाजपसाठी काळवंडलेली भासत असली तरी, नववर्षाची सकाळ उजाडणार आहे. कारण, राजकारण हे काही एका निवडणुकीवर थांबत नसते. तीन राज्यांतील निकाल भाजपसाठी काहीसे निराशाजनक असले तरी, तो काही पूर्णविराम नाही.
 

२०१८ मधील आजचा निरोपाचा दिवस. राजकीय क्षितिजावर २०१८ चा ताळेबंद मांडला जात असतानाच, २०१९ चे आराखडेही मांडले जात आहेत. २०१८ सरत आले असताना, बहुतेक चॅनेलवाल्यांनी, आपल्या जनमत चाचण्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यातील एक समान निष्कर्ष म्हणजे, भाजपला बहुमतासाठी संघर्ष करावा लागणार आहे आणि सारे काही उत्तर प्रदेशात होणाऱ्या युतीवर अवलंबून आहे. यात केवळ उत्तर प्रदेशचा विचार करून चालणार नाही, तर महाराष्ट्र आणि बिहारचाही विचार करावा लागणार आहे. उत्तर प्रदेशात, सपा-बसपा-राष्ट्रीय लोकदल यांची युती झाली आहे. म्हणजेच यादव, जाट, दलित, मुस्लीम हे समाजघटक या युतीसोबत राहणार आहेत. काँग्रेसचे काय, हा अद्यापही एक अनुत्तरित प्रश्न आहे. राज्यातील ८० जागांपैकी काँग्रेस किती जागा लढेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही सूत्रांच्या मते, काँग्रेस नमते घेत या युतीत सामील होईल वा वेगळे लढण्याची वेळ आलीच, तर काँग्रेस निवडक जागांवर आपले उमदेवार उभे करील. सपा-बसपाचा खेळ खराब करण्याचा प्रयत्न करणार नाही. याच कारणास्तव, राज्यातील काँग्रेस नेत्यांनी, अद्याप आक्रमक भूमिका घेतलेली नाही. सपा-बसपा-लोकदल युती भाजपसाठी त्रासाची ठरणार आहे. काँग्रेसमुळे तो त्रास वाढतो की कमी होतो, हे येणाऱ्या काही आठवड्यांत दिसणार आहे.

 

बिहारमधील युती

 

बिहारमध्ये भाजप व काँग्रेस आघाड्या तयार झाल्या आहेत. भाजप व रामविलास पासवान यांच्यातील जागावाटप झाले आहे. एकीकडे भाजप, जनता दल युनायटेड व रामविलास पासवान तर दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, जीतमराम मांझी व उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष अशी ही लढत होणार आहे. बिहारमधील एक अनुत्तरित घटक म्हणजे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा व खा. कीर्ती आझाद यांची भूमिका. दोघेही राज्यातील मातब्बर नेते मानले जातात. विशेषतः दोघेही भाजपचे कट्टर समर्थक होते. त्यांनी आजवर कधीही पक्षबदल केलेला नाही. त्यांच्याशी चर्चा करून विषय संपविला जाणे आवश्यक होते. अद्याप ती वेळ गेलेली नाही. या दोन्ही नेत्यांशी बोलून, झाले गेले विसरून त्यांनी कामाला लागावे, असा प्रयत्न व्हावयास हवा. शत्रुघ्न सिन्हा राज्यभर भाजपसाठी त्रासदायक ठरू शकतात. सिन्हा यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. पण, कीर्ती आझाद हे काही मंत्रिपदाचे दावेदार नव्हते. त्यांचा वाद होता दिल्ली क्रिकेट असोसिएशन संदर्भात. तो विषय भाजपपर्यंत येण्याचे कारण नव्हते. आताही हा विषय संपविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. त्यांचे वडील भागवत झा आझाद हे बिहारचे मुख्यमंत्री होते. काही मतदारसंघात तेही भाजपसाठी अडचणीचे ठरू शकतात. आणखी एक मुद्दा म्हणजे, बिहारच्या जागावाटपात भाजपला १७ जागा मिळाल्या आहेत. विद्यमान लोकसभेत, भाजपजवळ २२ खासदार आहेत. २०१४ मध्ये भाजपने २८-२९ जागा लढविल्या होत्या. स्वाभाविकच, भाजप ११-१२ जागा कमी लढविणार आहे. या मतदारसंघातील दावेदार व किमान पाच खासदार निवडणुकीत काय करतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकदा भाजप व मित्रपक्षांचे मतदारसंघ निश्चित झाले की, मग हे खासदार आपला विचार करतील. त्यातील किती खासदार-दावेदार पक्षाचा व्यापक विचार करतील व किती आपला विचार करतात, हे स्पष्ट झाल्यावर बिहारचे चित्र खऱ्या अर्थाने स्पष्ट होईल.

 

महाराष्ट्रातील समस्या

 

उत्तर प्रदेश नंतरच्या सर्वात मोठ्या राज्यात महाराष्ट्रात काय होईल, हेही स्पष्ट झालेले नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या आक्रमकतेने भाजप सरकारवर हल्ला चालविला आहे, ती आक्रमकता वेगळाच संकेत देणारी आहे. वास्तविक भाजप व सेना हे समविचारी पक्ष. शिवसेनेसोबत लहान भाऊ- मोठा भाऊ या वादात न अडकता ‘जुळे भाऊ‘ असा विचार करून हा प्रश्न सोडवायला हवा. यात चर्चेच्या फेऱ्या न करता निर्णय केला जाणे आवश्यक होते. शेवटी सेनेची अपेक्षा काय? दोन-तीन मंत्रिपदे! ती देऊन हा विषय केव्हाच संपविला जाणे आवश्यक होते. शिवसेना नक्की काय करील, हे स्पष्ट झालेले नाही. मोदी सरकारविरुद्ध टोकाची भूमिका घेतल्यानंतर सेनेने आता भाजपसोबत जागावाटप केले, तर यात सेनेचे हसे होणार आणि त्रिकोणी लढत झाल्यास दोन्ही पक्षांचे नुकसान होणार. ही स्थिती टाळली जाणे आवश्यक आहे. उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र या तीन राज्यांतील एकूण १६८ जागांपैकी १४८ जागा भाजप व मित्रपक्षांजवळ होत्या. फक्त २० जागा विरोधी पक्षांना मिळाल्या होत्या. यातील किती जागा भाजप व मित्रपक्ष कायम राखतात, यावर नव्या लोकसभेचे चित्र अवलंबून राहणार आहे.

 

फिर सुबह होगी...

 

२०१८ आज संपत असले तरी सकाळ उजाडणार आहे. आजची सायंकाळ भाजपसाठी काळवंडलेली भासत असली तरी, नववर्षाची सकाळ उजाडणार आहे. कारण, राजकारण हे काही एका निवडणुकीवर थांबत नसते. तीन राज्यांतील निकाल भाजपसाठी काहीसे निराशाजनक असले तरी, तो काही पूर्णविराम नाहीदेशाच्या राजकीय क्षितिजावर दिसणारे एक समान चित्र म्हणजे, बहुतेक राजकीय पक्ष भाजपच्या विरोधात एकजूट होत आहेत. थेट कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, कोलकातापासून ते कच्छपर्यंत म्हणजे शंकरसिंग वाघेलापर्यंत. विशेष म्हणजे, हे सारे पक्ष कधी ना कधी भाजपसोबत होते. दक्षिणेतील द्रमुकपासून, काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स, बंगालमधील ममतापासून, उत्तर प्रदेशातील मायावतीपर्यंत सर्वांनी भाजपसोबत साथसंगत केली आहे. हे सारेच पक्ष आज बिथरल्यासारखे का वागत आहेत, हा एक मोठा प्रश्न आहे. राजकारण हे निर्दयी असते, असे म्हटले जाते. ते पूर्णपणे चूक आहे. राजकारण हे साकारत असते ते मानवीय संबंधांच्या समीकरणातून.

 

इंदिरा गांधींची शाल

 

इंदिरा गांधी या ‘आयर्न लेडी’ म्हणून प्रसिद्ध होत्या. पंतप्रधान असताना, मंत्रिमंडळाची की काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू होती. दक्षिणेतील नेत्यांना दिल्लीतील थंडीची कल्पना नसते. ते आपली लुंगी, कुर्ता, पायजमा घालून येतात. केरळचे नेते के. करुणाकरन त्यातील एक. इंदिरा गांधींची नजर करुणाकरन यांच्यावर गेली. ते थंडीने कुडकुडत होते. ते पाहून इंदिरा गांधींनी आपल्या अंगावर ओढलेली शाल काढली आणि ती एका सेवकामार्फत करुणाकरन यांच्याकडे पाठविली. करुणाकरन अवाक् झाले. ते हा प्रसंग कधी विसरू शकतील? इंदिरा गांधी राजकीय संबंधांतील व्यक्तिगत संबंधांचा रेशीमबंध विसरल्या नाहीत१९७१ च्या युद्धात पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी शरणागती पत्करली होती. शरणागती सोहळा ढाक्यात होणार होता. जनरल माणेकशॉ स्वत: त्या सोहळ्यास जाऊ शकत होते. त्यांचे नाव अजरामर झाले होते. स्वत: न जाता त्यांनी लेफ्ट. जनरल जगजीतसिंग अरोरा यांना त्या सोहळ्यास जाण्यास सांगितले. जनरल माणेकशॉ यावरच थांबले नाहीत. त्यांनी अरोरा यांनी दूरध्वनी करून सांगितले, “हा तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे. एकटा जाऊ नकोस, सोबत आपल्या पत्नीलाही घेऊन जा.” लेफ्ट. जनरल अरोरा आयुष्यभर माणेकशॉ यांनी दाखविलेला आदर विसरू शकले नाहीत.

 

रोझेस इन डिसेंबर

 

आज डिसेंबरचा शेवटचा दिवस. न्या. एम. सी. छागला, यांचे ‘रोसेझ इन डिसेंबर‘ या नावाने लिहिलेले आत्मचरित्र फार गाजले होते. न्या. छागला शेवटी लिहितात, “मी माझ्यासोबत काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यास कधी टाकून बोललो नाही. ते बिचारे तुमचा प्रतिवाद करण्याच्या स्थितीत नसतात. त्यामुळे ते मुकाटपणे ऐकून घेतात. आपण आयुष्यभर खूप काम करतो. अनेक उपलब्धी आपल्या नावाने जमा होतात. पण, शेवटी आठवणीत राहातात ते आपले व्यक्तिगत मानवीय व्यवहार.”

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@