अहमदनगर महापालिकेवर भाजपचा महापौर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2018
Total Views |
 

अहमदनगर :  अहमदनगर महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडीत भाजपने इतर पक्षांना शह देत बाजी मारली आहे. राष्ट्रवादी व बसपा यांच्या पाठिंब्यावर भाजपाचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले. मात्र, यात सेनेला सर्वाधिक जागा मिळूनही त्यांना सत्तेपासून दूर रहावे लागणार आहे.

 

दरम्यान शुक्रवारी सकाळी ११ वाजता महापौर निवडीची सभा पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. शिवसेनेच्या २४ नगरसेवकांपैकी २३ नगरसेवक सभागृहात यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महापौर पदाचे उमेदवार संपत बारस्कर, अविनाश घुले, नज्जू पहिलावान हे नगरसेवक आणि भाजपचे उमेदवार बाबासाहेब वाकळे सकाळी पालिकेत आले होते.

 

महापौर पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कडून उमेदवारी दाखल केलेल्या संपत बारस्कर यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे वाकळे व सेनेचे बाळासाहेब बोराटे, असे दोन उमेदवार रिंगणात होते. वाकळे यांना ३७ नगरसेवकांची मते मिळाली. त्यात भाजपची १४, राष्ट्रवादीची १८, बसपा आणि अपक्ष अशा मतांचा समावेश आहे. सेनेचे बोराटे यांना २३ इतकी मते मिळाली, भाजपाच्या मालन ढोणे उपमहापौर झाल्या आहेत. 

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 

 
@@AUTHORINFO_V1@@