निफाडला भरली हुडहुडी, तापमान १.८ अंश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2018
Total Views |


 
 
 
नाशिक : बुधवारी नाशिकमधील निफाड येथे ११ अंश तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये १२ तासांमध्ये तापमान १० अंशांनी उतरले. गुरुवारी सकाळी ७ वाजता निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. १.८ अंश तापमान झाले असून त्यामुळे तेथील थंडीत वाढ झाली आहे. थंडी वाढल्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
 

थंडीमुळे पाणी उतरलेली द्राक्ष तडकण्याची शक्यता असते. तसेच ज्या द्राक्षांमध्ये पाणी उतरलेले नाही अशा द्राक्षांची फुगवन क्षमता थांबेल अशी भीती सोनेवाडी येथील द्राक्ष निर्यातदार बाळासाहेब सानप यांनी व्यक्त केली आहे. थंडीपासून द्राक्षबागांना ऊब मिळण्यासाठी निफाडमधील काही द्राक्षबागांमध्ये शेकोटी पेटवली जात आहे. जुन्या साड्या आणि शेडनेट लावून थंडीपासून द्राक्षांचा बचाव करण्याचा प्रयत्न द्राक्ष उत्पादकांकडून केला जात आहे. नाशिकच्या गोदाकाठाववर उसाच्या शेतात थंडीमुळे दवबिंदू गोठून बर्फ तयार झाले आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@