अडीच वर्षाच्या ‘या’ घोडीवर दीड कोटींची बोली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2018
Total Views |

 

 
 
 
 
नंदुरबार : नंदुरबार येथील सारंगखेड्यामध्ये चेतक फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. येथील घोडे बाजारात ३ हजारांहून अधिक घोडे विक्रीसाठी आले आहेत. घोडे खरेदीसाठी लोकांनी येथे मोठी गर्दी केली आहे. येथे एका घोड्याची विक्री लाखो रुपयांना होत आहे. ‘पद्मा’ ही अडीच वर्षांची घोडी या बाजारात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. पद्मा या घोडीवर आतापर्यंत दीड कोटी रुपयांची बोली लागली आहे.
 

महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्याची वंशज असलेल्या पद्मा या घोडीच्या सुरक्षेसाठी चारजण कडक पहारा ठेवून आहेत. पद्मा या घोडीला थंडी वाजू नये, म्हणून हिवाळ्यात हिटर लावला जातो. तर उन्हाळ्यात गरम होऊ नये म्हणून एसी लावला जातो. ही घोडी दररोज १० लीटर दूध पिते आणि चणे खाते. चेतक फेस्टिव्हलमध्ये दाखल होण्याची पद्मा या घोडीची ही दुसरी वेळ आहे. पद्मा या घोडीने आजवर राजस्थान, मध्यप्रदेश आणि पंजाब येथील स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. पद्मा या घोडीवर सध्या चेतक फेस्टिव्हलमध्ये दीड कोटी रुपयांची बोली लागली आहे. परंतु “कोणी १० कोटी रुपये दिले तरी पद्मा या घोडीची विक्री करणार नाही.” असे इंदौर येथील पद्मा या घोडीचे मालक लाडकाभाई यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@