उद्या केबल होणार बंद !

    26-Dec-2018
Total Views | 20
 

मुंबई : प्रत्येक वाहिनीनुसार पैसे घेण्याचा निर्णय ट्रायने जाहीर केल्याच्या निशेधार्थ राज्यातील केबल व्यावसायिकांची गुरुवारी बैठक घेण्यात आली होती. त्यात आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय ट्रायने केला आहे.

 

ट्रायच्या निर्णयाविरोधात गुरुवारी सायंकाळी ते १० वाजेपर्यंत राज्यभरातील केबल बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष आ. अनिल परब यांनी दिली आहे. स्टार कंपनीवर शुक्रवारी मोर्चा काढण्यात येणार असून या कंपनीचे बुके (चॅनलचे पॅकेज) घेणार नसून, त्यावर बहिष्कार घालण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

 

केबल ऑपरेटर अँन्ड ब्रॉडकास्टर असोसिएशनने बुधवारच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सायंकाळी महत्वाच्या वेळेमध्येच केबल बंद राहणार असल्याने राज्यभरातील दर्शकांना आणि ब्रोडकास्टर्सना त्याचा फटका बसणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121