
नवी दिल्ली : भारतरत्न अटबिहारी वाजपेयी यांची आज ९४ वी जयंती. देशाच्या लाडक्या पंतप्रधानांच्या जन्मदिनानिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. नवी दिल्ली येथे राजघाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांना अभिवादन केले. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये झाला होता. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, राजनेता, कवि, पत्रकार, प्रखर वक्ता म्हणून ओळखले जायचे. १९४२मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतला होता. यासाठी त्यांच्या मोठ्या भावाला २३ दिवस कारागृहात राहावे लागले होते.
वाजपेयी यांनी जनसंघात सक्रीय सहभाग घेतल्यानंतर पहिली निवडणूक १९५७मध्ये उत्तर प्रदेशातील बलरामपुरच्या जागेतून लढवली होती. त्यानंतर ते पक्षात १९६९ ते १९७२ पर्यंत अध्यक्ष झाले. १९९७मध्ये ते मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रीही बनले. अटल बिहारी वाजपेयी १९९६मध्ये देशाचे पंतप्रधान झाले. या दरम्यान त्यांचे सरकार १३ दिवसात अल्पमतात गेले. २०१५ मध्ये भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च सन्मान पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनातील १० महत्वाच्या गोष्टी
१. . अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी मध्यप्रदेशच्या ग्वालियरमध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव श्री कृष्णा बिहारी वाजपेयी आणि आईचे नाव कृष्णा देवी होते. त्यांचे वडिल शिक्षक होते.
२. अटलजींनी ग्वाल्हेरच्या व्हिक्टोरिया महाविद्यालयात हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी विषयातून पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी कानपूरच्या डिएवी महाविद्यालयातून राज्यशास्त्रात एम.ए.चे पद्वुत्तर शिक्षण घेतले.
३. अटल बिहारी वाजपेयी देशाचे दहावे पंतप्रधान होते. तीन वेळा ते देशाचे पंतप्रधान बनले.
४. पहिल्यांदा १६ मे १९९६ ते १ जून १९९६, दुसऱ्यांदा १९ मार्च १९९८ ते २६ एप्रिल १९९९ आणि तिसऱ्यांदा १९९९ ते २००४ पर्यंत ते या पदावर होते.
५. वाजपेयी आयुष्यभर अविवाहीत राहीले. त्यानंतर त्यांनी एका मुलीला दत्तक घेतले. त्यांनी तिचे नाव नमिता.
६. अटलजींनी १९७७मध्ये संयुक्त राष्ट्र सभेत पहिल्यांदा हिंदी भाषण केले होते. हिंदी भाषेला जगापुढे मांडण्यात आणि पोहोचवण्याचे काम संयुक्त राष्ट्राच्या सभेत करणारे ते पहिले पंतप्रधान ठरले.
७. राजकारणात येण्यापूर्वी ते पत्रकार होते. पांचजन्य, राष्ट्रधर्म, वीर अर्जून आणि स्वदेश आदी वृत्तपत्रांमध्ये त्यांनी लिखाण केले होते.
८. राजकारणात ते १० वेळा लोकसभा सदस्य बनले तर दोनवेळा राज्यसभा सदस्य़ बनले.
९. अटल बिहारी वाजपेयी यांनी पोखरणमध्ये पाच अणुचाचण्या यशस्वीरित्या घडवून आणल्या होत्या. यानंतर भारत देश जगासमोर एक विश्वशक्ती म्हणून उदय़ाला आला.
१०. २०१५मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं सरकारने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशा या अटल युगपुरुषाने दिल्लीतील एम्स रुग्णालयात १६ ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/