नवी दिल्ली : फरार उद्योगपती मेहुल चोकसीने मुंबई उच्च न्यायालयात दिलेल्या माहितीत ४१ तासांचा प्रवास करून भारतात येऊ शकत नाही असा, असा कांगावा केला आहे. कर्ज गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयात उत्तर देताना त्याने आजारपणाचेही कारण पुढे केले आहे. यावेळी त्याने सक्तवसुली संचलनालयावरही (ईडी) आरोप लावले आहेत. माझ्या आजारपणाबद्दल ईडीने माहिती न देता न्य़ायालयाला अंधारात ठेवल्याचेही तो म्हणाला आहे.
दरम्यान माझ्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मी बॅंकांच्या संपर्कात आहे, असेही तो म्हणाला आहे. व्हिडोओ कॉन्फरन्सिंगद्वारे जबाब नोंदवण्यास त्याने तयारी दर्शवली आहे. ईडीच्या विशेष न्यायालयाने चोकसीला फरार घोषित केले असून त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जाहीर केले आहे त्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आग्रह केला होता. मेहुल चोकसीवर पंजाब नॅशनल बॅंकेत १३ हजार ५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या आरोप आहे. चोकसी गितांजली ग्रुपचा अध्यक्ष आहे. सध्या तो एंटीगुआमध्ये लपून बसला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/