तळोद्यात 11 जोडप्यांचे एकाच मंडपात शुभमंगल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

माळी समाज पंचातर्फे सामुदायिक विवाह सोहळा ; मान्यवरांकडून वधु-वरांना मदत


 
 
 
तळोदा : 
 
येथील श्री समस्त माळी समाज पंचातर्फे आठवा सामुदायिक विवाह सोहळा होऊन त्यात 11 जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले. तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालयात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
 
 
या विवाह सोहळ्यात व्यासपीठावर खा. डॉ.हिना गावित , आ. उदेसिंग पाडवी , नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी पालकमंत्री पद्माकर वळवी, सिनेट सदस्य भरत माळी, जिल्हा उपाध्यक्ष सुहास नाईक , नगरसेवक गौरव वाणी, नगरसेवक संजय माळी, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष नीळकंठ महाजन यावेळी उपस्थित होते.
 
 
मेळाव्यासाठी समस्त माळी समाज पंचाचे अध्यक्ष ईश्वरलाल मगरे, उपाध्यक्ष विनायक माळी, सचिव मित्तलकुमार टवाळे , भरत माळी, मधुकर मगरे, गिरधर सागर, उखा पिंपरे, अरविंद मगरे, भिका मगरे, सुधीरकुमार माळी, विजय शेंडे, योगेश्वर पंजराळे, अनिल मगरे, लक्ष्मण सागर, मोहन सूर्यवंशी, हेमलाल मगरे, सुरेश चव्हाण, अजित टवाळे, जयेंद्र सूर्यवंशी, राजाराम राणे, वतनकुमार मगरे, भगवान मगरे, हिरालाल कर्णकार, महेश माळी, भगवान कर्णकार, भानुदास राजकुळे, पंकज राणे ,सुनिल सूर्यवंशी, आबालाल चव्हाण, शशिकांत सूर्यवंशी, पंकज शेंडे, माळी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा ललिता मगरे, उपाध्यक्षा मनीषा मगरे व सचिव जयश्री मगरे यांनी परिश्रम घेतले.
राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी दिला मदतीचा हात
 
 
विवाह सोहळ्यात अन्नदान समस्त कांचमाळी समाज कार्यकारिणीकडून करण्यात आले. याव्यतिरिक्त आ.उदेसिंग पाडवी 21 हजार , पद्माकर वळवी 21 हजार , नगराध्यक्ष अजय परदेशी 21 हजार , लक्ष्मण माळी , भरत माळी व संजय माळी यांच्याकडून 31 हजार 555 रु., चेतन पवार 11 हजार , प्रसाद सोनार, अमोल सोनार , मिलिंद सोनार ह्यांच्याकडून प्रत्येकी वधुस 1 ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसूत्र ,हाजी निसार अली मकरांनी 15 हजार , मालिनी व संजय राणे 11 हजार ,वासुदेव कर्णकार 11 हजार 111 रु, दीपक सूर्यवंशी 11 हजार 111 रु, युवराज मगरे 5 हजार 555 रू , गौरव वाणी 5 हजार 555 रू , हितेंद्र क्षत्रिय , संदीप परदेशी , योगेश मराठे या प्रत्येकाकडून 3101 रू., प्रा.विलास डामरे 5 हजार 555 रु., कल्याणी मगरे 5 हजार 555 रु., लक्ष्मण महाजन, शोभना महाजन यांच्याकडून प्रत्येक जोडप्यास 1 तोळे चांदीचे जोडवे , हेमलता पिंपरेंकडून प्रत्येक जोडप्याला भेटवस्तू , किरण गॅस एजन्सीकडून स्वयंपाक गॅस सिलेंडर , चंदूलाल ठाकरसी अ‍ॅन्ड कंपनीतर्फे प्रत्येक जोडप्याला एक भेटवस्तू , श्री क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळाकडून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था , सुनिल कर्णकारतर्फे हळद व लग्न समारंभासाठी बँडबाजा, कमल मगरे व मनोज मगरेतर्फे प्रत्येक वरवधूचे लग्नदाफे, जयेंद्र मगरेतर्फे प्रत्येक जोडप्यास सिलिंग फॅन , हेमलाल मगरेतर्फे प्रत्येक वरवधूस भेटवस्तू , गणेश सोशल ग्रुप व ज्योत्स्ना व मित्तलकुमारतर्फे प्रत्येक वरवधूस भेटवस्तू व उमाकांत शेंडेतर्फे फेटा बांधणे आदी देणगीच्या स्वरुपात देण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@