जनजाती बांधव हेच भारत मातेचे सच्चे सुपुत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |


नंदुरबारच्या जनजाती चेतना परिषदेत केंद्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमारजी साय यांचे प्रतिपादन



 
 
 
नंदुरबार : 
 
सर्व समाजजीवन आणि जगभरातील मानवी जीवन अनेक समस्या आणि अंतर्विरोधांनी ग्रस्त आहे. मात्र सुख, समृध्दी, शांतता, सुरक्षितता, पर्यावरण आदी अंगानी विचार केला असता जनजाती बांधव हेच भारत मातेचे सच्चे सुपुत्र आहेत,
 
 
अश्या आशयाचे आग्रही प्रतिपादन नंदुरबारच्या जनजाती चेतना परिषदेत केंद्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमारजी साय यांनी समारोप सत्रात केले. या परिषदेला जिल्ह्यातून प्रचंड, सुखद प्रतिसाद मिळाला. पुढील वर्षीही अशी परिषद होण्याची ग्वाही सहसचिव डॉ. विशाल वळवी यांनी दिली.
 
 
दुपारी दुसर्‍या सत्रात प्रारंभी सांघिक गीत झाले. नंतर जनजातीतील प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा सत्कार झाला, पारंपरिक कला संगोपन क्षेत्रातील कार्याबद्दल ओल्या रुपा पाडवी (काठी), रावलापाणी परिसरातील देखभालीबद्दल रतिलाला कामा पावरा (रावलापाणी), प्रशासन सेवेतील गुणवंत आणि विशेष सेवा पदकाने सन्माणित ट्रायबल टॅलेंट फाउंडेशनचे अजय खर्डे (तळोदा), वैज्ञानिक शेती आणि पशू पालक रशीद वळवी (धनराट), अर्चना वळवी (पालीपाडा) यांना स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
 
 
‘जनजाती का संघटन कर, ध्येय मार्गपर चलते है हम....’ हे सामूहिक पद्य अतिशय सुरेल आवाजात सादर झाले. समारोपपर प्रमुख भाषणांत केंद्रिय जनजाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी खणखणीत, अभ्यासपूर्ण भाषणात प्रारंभी जनजातींची भूमिका स्पष्ट केली. भगवान या शब्दाचा अर्थ आणि धरती मातेचे विविध रुप त्यांनी स्पष्ट केली.
 
 
जनजातींच्या परंपरांचे पालन केल्यास पर्यावरणासह पृथ्वी आणि मानवजातीचे आपोआप संरक्षण होईल, असा दावाही त्यांनी केला. धर्माचा अर्थ तत्त्वज्ञांनी किती सुंदर पध्दतीने मांडला आहे याबाबतचे विचार त्यांनी स्पष्ट केले. धैर्य (धीर), क्षमा, काटकसर (निर्मोही वृत्ती), आस्तेय, चोरी, चपाटी, लबाडी न करणे, स्वच्छता, इंद्रिय निग्रह, वीरता (अचलता), विद्या, सत्य या दहा गुणांचे अविष्करण म्हणजेच धर्म असेही त्यांनी संस्कृत श्लोकाचे विवेचन करुन सोदाहरण स्पष्ट केले.
 
 
शासकीय प्राथमिक शाळांमधील अनास्था, ही सर्वच समाजातील विद्यार्थांना हानीकारक आहे ती दूर व्हावी, जनजातीतील विद्यार्थांचे चांगले गुण क्रीडा-कौशल्य यांना वाव मिळाल्यास ते देशालाही भूषणावह ठरतील, धर्मांतर आणि अप्रिय घटनाही टळतील. अशा संस्था सुरू करण्यासाठी पन्नास कोटी खर्च करण्याची योजनाही आपण राबवू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
 
 
जनजातीचे अनेक भूखंड हडप करण्यात आलेले आहेत. ते आपण कोणत्याही परिस्थितीत त्यांना परत मिळवून देवू, जनजातीच्या उन्नतीसाठी सर्वच समाज घटकांनी सहयोग दिला पाहिजे, जनजातीच्या मुलांना क्रिडा क्षेत्रात वाव द्या, सेनादलात नियुक्ती द्या, कारण देशात सर्वत्र राष्ट्रीय चारित्र्याचा अभाव आहे. मात्र ’धर्म’ सूत्रांचे पालन अर्थात धरती, राष्ट्र यांच्या प्रति जनजाती कायमच प्रामाणिक राहिल्या आहेत. त्या कोणाशीही दगा, फटका करीत नाहीत, म्हणून प्रकृती, पर्यावरण सुरक्षा, भृणहत्या, आत्महत्या आदींबाबत त्यांना समस्या नाहीत, असे त्यांनी सोदारण स्पष्ट केले आणि या भोळ्या भाबळ्या बांधवांना धर्मांतरवादी आणि नक्षलींपासून दूर ठेवण्यासाठी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे, तर सारा देश आणि सीमाही सुरक्षित राहतील असा महत्त्वपूर्ण विचारही त्यांनी मांडला.
 
 
‘निर्माणो के पावन युग में,
हम चरित्र निर्माण न भूले’
 
हे संघाचे आशयघन पद्यही त्यांनी सुंदर स्वरात सादर केले.
 
‘स्वार्थ साधना के आंधी में
वसुधा का कल्याण न भूले’
 
असे संदेशपर आवाहन केले.
 
 
जनजातीचे समाजबांधव हेच श्रेष्ठ हिंदू कसे ?..., हे नंदकुमार साय यांनी स्पष्ट करतांना, ‘मैं वही प्रतापी हिंदू हूँ’ ही मुक्त छंदातील अर्थपूर्ण कविता खणखणीत स्वरात, सुस्पष्ट शब्दात सादर करुन जनजाती बांधव हेच भारत मातेचे सच्चे सुपुत्र आहेत हे तासाभराच्या प्रभावी भाषणांत पटवून दिले.
 
आयोजन समितीचे सहसचिव वीरेंद्र वळवी यांनी आभार मानले. ‘भारत माता की जय’ अशा घोषणांच्या निनादात सांगता झाली.

47 जनजाती असतांना त्या 84 कशा झाल्या  ?
 
* जनजाती चेतना परिषदेचे सचिव डॉ. विशाल वळवी (नंदुरबार) यांनी 1995 पासूनच्या बोगस आदिवासी या निदान झालेल्या महारोगाबद्दलचे भीषण व संतापजनक वास्तव सोदाहरण लक्षात आणून दिले.
 
बेग, कोलम, अन्सारी इत्यादी बनावट जातवैधता प्रमाणपत्र धारकांबद्दलची उदाहरणे त्यांनी दिली. औरंगाबादच्या व. सु. पाटील या भ्रष्ट कर्मचार्‍याने प्रत्येकी तीन लाख रुपये लाच घेत सात हजार पाचशे बोगस जात वैधता प्रमाणपत्र दिल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
47 जनजाती असतांना त्या 84 कशा झाल्या ? संबंधितांनी कारवाईच्या भीतीने एक कोटी सात लाख रुपये कसे भरले, याचे उदाहरणही त्यांनी दिले. सर्वोच्च न्यायालयाने चार हजार पाचशे बोगस आदिवांसी नोकरीधारकांना त्वरित निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले. हे प्रकार टाळण्यासाठी नवीन शासन निर्णय काढण्यात यावा अन्यथा देवगिरी कल्याण आश्रमातर्फे आंदोलन छेडले जाईल असा इशाराही डॉ. विशाल वळवी यांनी दिला.
 
 
* बारीपाड्याचे विख्यात समाजसेवी चैत्राम पवार यांनी सामूहिक वनाधिकार गावाला मिळावे यासंबंधी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. जंगल, वन, जल, गो-धन हे चक्र तुटले तर एकूणच मानवी समाज समृध्दीपासून दूर जाईल. पाणीटंचाई, दुष्काळ, बेरोजगारी, स्थलांतर इत्यादी प्रश्न निर्माण होतील असा इशाराही त्यांनी तळमळीच्या भाषणांत दिला.
@@AUTHORINFO_V1@@