जलस्तरवाढीसाठी भडगाव येथे नांगरली नदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

माझे गाव , माझा परिसर प्रतिष्ठानचा उपक्रम, सिंचनासाठी होणार फायदा

 
भडगाव : 
 
येथे माझे गाव माझा परिसर प्रतिष्ठान भडगाव व महेंद्र ततार मित्र परिवाराच्यावतीने नदी नांगरून जलस्तर भर उन्हाळ्यात 150 ते 200 फुटावरून 80 ते 90 फुटावर आणण्याचा प्रयत्न केला आहे.
 
 
दरवर्षी येणार्‍या पुराच्या पाण्यातील ’फाईन पार्टीकल’ वाळूत साचून दोन-तीन फुटावर ते स्थिर होतात. थरावर थर साचून त्याचे खडकीकरण होत जाते. अर्थातच, पाणी खाली न झिरपता वाहून जाते.परिणामी , पाण्याची झिरपण्याची प्रक्रिया होत नाही.
 
 
विहिरी कोरड्या पडतात. जलस्तर जास्त प्रमाणात खाली जातो. त्यामुळे नदी नांगरून काढली तर तो बसलेला दगड मातीचा थर मिटवून पाणी झिरपू शकते, हा प्रयोग बहुतेक ठिकाणी केला जातोय.
 
 
सर्वप्रथम या प्रयोगाला सुरुवात शहादा तालुक्यातील गोमाई नदीकाठच्या डांबरखेडा येथे मोतीलाल पाटील यांच्या कल्पनेतून साकारण्यात आली आणि त्यात ते यशस्वी झाले.
 
 
समाजाचे काही देणे लागतो याचा विचार करून मी व माझे गाव माझा परिसर प्रतिष्ठान व सर्व मित्र परिवारातर्फे हा प्रयोग गावासाठी सुरू केला. तो यशस्वी होईल असा विश्वास आहे.
 
 
त्यामुळे सध्या अंदाजे 1 ते 5 किलोमीटर भागात 3 ते 4 एकर इतकीच नदी नांगरून काम सुरू करण्यात आले. हे काम यशस्वी झाल्यावर परिसरातील आवश्यक तितके काम करू आणि गावातील नदीजवळील शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना पाणीटंचाईपासून सुखाचा दिलासा देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन माझे गाव माझा परिसर प्रतिष्ठान व महेंद्र ततार मित्र परिवाराने दिले आहे.
 
 
या कार्यक्रमाचे उद्घाटन अमोल शिंदे व पाटबंधारे विभागाचे उपअभियंता हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपरिषेदेचे मुख्यधिकारी विकास नवाळे अध्यक्षस्थानी होते.
 
 
या कार्यक्रमाला नगरसेवक अमोल पाटील, मास्टरलाईनचे संस्थापक समीर जैन, अमोल शिंदे, मुख्याधिकारी विकास नवाळे, व पाटबंधारे विभागाचे अभियंता पी.टी.पाटील, उपनगराध्यक्ष डॉ. वसीम मिर्झा, नगरसेवक अमोल पाटील, संतोष महाजन, अतुल पाटील, जगन भोई, शाम पाटील, बबलू देवरे, नगरसेविका योजना पाटील, पाटबंधारे खात्याचे रामटेके, समाजसेवक जाकीर कुरेशी, निंबा महाजन, संभाजी पाटील व माझे गाव माझा परिसर प्रतिष्ठानचे संचालक, सदस्य व सर्व मित्र परिवार उपस्थित
होते.
 
सूत्रसंचालन आदर्श कन्या शाळेचे रोकडे यांनी केले. आभार प्रतिष्ठानचे संस्थापक महेंद्र ततार यांनी मानले.
@@AUTHORINFO_V1@@