खडसे महाविद्यालयात गणित दिन साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

मुक्ताईनगर :
 
येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात गणित विभागामार्फत राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. आर. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना गणित दिनाचे महत्व सागितले.
 
रामानुजन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गौरव पाटील यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाचे स्वरूप व महत्त्व स्पष्ट केले. या कार्यक्रमात गणित विभागाातील मयुरी तांबट या विद्यार्थ्यीनीने मनोगत व्यक्त केले.
 
सूत्रसंचालन श्रीकृष्ण बोंबटकार यांनी केले. आभार प्रदर्शन तृप्ती रायपूरकर हीने मानले. कार्यक्रमाचेे आयोजन गणित विभाग प्रमुख व महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस.एम.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
 
 
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात गणितीय संकल्पनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
@@AUTHORINFO_V1@@