मराठा समाजाच्या मेळाव्यात 350 युवक-युवतींनी दिला परिचय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

जळगाव : 
 
शहरात रविवारी झालेल्या वधू-वर परिचय मेळाव्यात अनेक विवाहेच्छूकांनी परिचय करुन दिला. परिचय मेळाव्यास महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातूनही समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
जळगाव येथील मराठा मंगल या विवाह व प्रबोधन स्वयंसेवी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वधु-वर परिचय मेळाव्यात 350 विवाहेच्छूक युवक- युवतींनी परिचय दिला. मराठा मंगलतर्फे शहरातील रोटरी भवन येथे परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सातपुडा ऑटोमोबाईल्स्चे संचालक प्रा. डी.डी. बच्छाव हे होते.
 
 
मेळाव्याच्या प्रारंभी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. व्यासपीठावर मेळाव्याचे संयोजक व मराठा मंगलचे संस्थापक डॉ.राजेश पाटील, आर.बी.पाटील, नगरसेविका लताताई भोईटे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, ज्योती चव्हाण, प्रतिभा देशमुख, प्रतिभा पाटील, नवनाथ दारकुंडे, मयूर कापसे, राजेंद्र मराठे तसेच मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राम पवार, सुरेंद्र पाटील, सुरेश पाटील, विजय पाटील, प्रमोद पाटील, आबा कापसे, छावाचे भीमराव मराठे, आर.व्ही. पाटील, बुलंद छावाचे प्रमोद पाटील उपस्थित होते.
 
 
सुरुवातीला डॉ.राजेश पाटील यांनी मराठा मंगलच्या तीन वर्षाच्या वाटचालीसंदर्भात माहिती दिली. माहिती अधिकार कायद्याचे अभ्यासक आर.बी.पाटील यांनी विधवा व परित्यक्ता यांच्या पुनर्विवाहासाठी महापालिकेकडून एक लाखापर्यंत मिळू शकते, अशी माहिती दिली. संयोजकांच्यावतीने डॉ. सीमा पाटील यांनी नगरसेवकांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा सत्कार केला.
 
 
अध्यक्षीय भाषणात प्रा.बच्छाव यांनी अशा प्रकारचे समाज परिवर्तन करणारे मेळावे यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले आणि अनिष्ट रूढी- परंपरा दूर करण्याचे आवाहन केले. त्यानंतर नाममात्र घटस्फोटित विधूर तसेच नवीन इच्छूक उमेदवारांनी आपला परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र देशमुख यांनी केले. यशस्वीतेसाठी बाळासाहेब चव्हाण, संजय साळुंखे, योगेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.
विविध राज्यातून समाजबांधवांची उपस्थिती
 
 
परियच मेळाव्याला मुंबई-पुणे, विदर्भ, मराठवाडा, खान्देश तसेच महाराष्ट्राबाहेरील भोपाळ, इंदूर व सुरत या ठिकाणाहून समाज बांधवांनी उपस्थिती दिली. मेळाव्यास पाचशेहून अधिक उपवर, विधवा, निराधार, विधूर, घटस्फोटित, परित्यक्ता, दिव्यांग विवाहेच्छुकांनी नोंदणी केली होती.
 
त्यापैकी 350 उपवर युवक - युवतींनी आपला परिचय करुन दिला. परिचयात युवक-युवतींनी आपल्या भावी जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा सांगताना अनुरुप जोडीदार मिळावा, अशी भावना व्यक्त केली.
@@AUTHORINFO_V1@@