सीएम चषक हँडबॉल स्पर्धेने रविवार गाजला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

 
चाळीसगाव : 
 
सी.एम.चषक नावाजलेला कला क्रीडा महोत्सव अंतर्गत चाळीसगावात रविवारी दुपारी 1 वाजता हिरापूररोडवरील नानासाहेब यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर हँडबॉल स्पर्धा घेण्यात आली. हॅण्डबॉल स्पर्धेचे उद्ाटन आ. उन्मेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
 
यावेळी मुलांचे आठ व मुलींचे चार संघांनी भाग घेतला हँडबॉल स्पर्धेच्या निमित्ताने जुने-नवे खेळाडूंचा सहभाग असलेल्या अनेक संघांनी सहभाग नोंदवला.
 
स्पर्धेसाठी शहरातील क्रीडाशिक्षक अजय देशमुख, बाबा सोनवणे, प्रवीण राजपूत, अमोल पाटील, युवराज भोसले, जे. पी. वाघ, संजय राजपूत, युवराज भोसले, सीमा माळदकर, पंकज साळुंखे, डी. वाय. चव्हाण, हेमंत गोरे, रेखा धनगर पंच म्हणून काम पाहिले. एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ. सुनील राजपूत, पं.स. उपसभापती संजय पाटील, सदस्य भाऊसाहेब पाटील, युवा उद्योजक मंगेश चव्हाण, वसुंधरा फाउंंडेशनचे संजय पवार, तालुका आत्मा कमेटीचे अध्यक्ष रवींद्र चौधरी, सी. एम. चषक जिल्हा संयोजक कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते नरेन जैन, युवा कार्यकर्ते जितेंद्र वाघ, पाचोरा बाजार समिती संचालक रवींद्र पाटील पिंप्रीकर, शेषराव चव्हाण, सी एम चषक तालुका स्पर्धा समन्वयक सचिन पवार मान्यवर उपस्थित होते आनंदीबाई बंकट शाळेला पाहिले, याच शाळेच्या ज्युनिअर गटाला दुसरे व काकासाहेब पूर्णपात्रे शाळेला तिसरे बक्षीस मिळाले.
 
 
स्पर्धेसाठी भाजप युवा मोर्चाचे अक्षय मराठे, सागर पाटील, शिवराज पाटील, धनंजय मराठे, विशाल कारडा, योगेश गव्हाणे, जितेंद्र पाटील, किशोर गवळी, सर्वेश पिंगळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@