माळी समाजाच्या मेळाव्यात 389 जणांनी दिला परिचय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

नोकरीचा अट्टहास नको :  शालीग्राम मालकर

 
 
 
 
सर्वत्र विवाहविषयक निर्णय घेतांना वधू परिवाराकडून नोकरदार वर मिळावा अशी अपेक्षा असते. मात्र समाजात शिक्षणाची पत जरी सुधारली असली तरी प्रत्येक तरुणाला नोकरी मिळेलच याची शाश्वती नसल्यामुळे नोकरीचा अट्टहास न करता शेतकर्‍यांच्या मुलांचाही विचार करावा, असा सल्ला महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्राम मालकर यांनी दिला.
 
 
लाठी शाळेत रविवारी माळी महासंघातर्फे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास विवाहेच्छूक 389 मुला-मुलींनी परिचय करुन दिला. मेळाव्यास राज्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, दोन विवाह जुळण्याच्या अखेरच्या टप्प्यात असल्याचे आयोजकांनी सांगितले.
 
 
व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दलितमित्र माधवराव हुडेकर तर प्रमुख पाहुणे दिलीप देवरे यांच्यासह डॉ. नलिन महाजन, देवीदास महाजन, ज्ञानेश्वर महाजन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, शिवसेनेचे गुलाबराव वाघ, आत्माराम माळी, नाना महाजन, प्रा.उत्तम पवार, प्रकाश महाजन, वसंत पाटील, मुरलीधर महाजन, भीमराव महाजन, राजेंद्र महाजन, सोमनाथ महाजन, गोपाळ बाविस्कर आदी उपस्थित होते.
 
 
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करुन महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत सावता माळी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण झाले. यानंतर वधू-वर सूचीचे प्रकाशन करण्यात आल्यावर विवाहेच्छूक मुला - मुलींनी परिचय करुन दिला.
देवीदास महाजन म्हणाले की, तरुणांनी स्वयंरोगजाराला प्राधान्य देवून सक्षम व्हावे. वेळप्रसंगी समाजासाठी अनेक संघटनांनी एकत्र येवून काम करायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
 
 
नगरसेविका सरिता नेरकर म्हणाल्या की, घरातील स्त्रीला समाजात जावू द्या. समाज हे हक्काचे घर आहे. त्याठिकाणी तिला आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. गुलाबराव देवकर यांनी कार्यक्रमाचे कौतुक करुन उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील, धनराज माळी यांनी तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दिनेश पाटील यांनी केले. आभार प्रा. नितीन चव्हाण यांनी मानले.
 
 
यशस्वीतेसाठी भास्कर पाटील, कृष्णा माळी, प्रभाकर जाधव, रवींद्र जाधव, संजीव माळी, संतोष महाजन, दिलीप माळी, भागवत बोंबटकर, विनोद पाटील, दिनकर माळी, ज्ञानेश्वर माळी, हनुमंत महाजन, राजेंद्र महाजन, नितीन चव्हाण, दिनेश माळी, वना महाजन, गोपाल बाविस्कर, राजेंद्र महाजन, नलीन महाजन, बाबुलाल माळी, श्याम पाटील, प्रदीप महाजन, दगडू माळी, गोकुळ रोकडे, प्रशांत महाजन, सतीश महाजन, चिंधू मोकळ, राजेंद्र महाजन, अभिलाषा रोकडे, शीतल पाटील, नरेश महाजन, सुरेश महाजन आदींनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@