जनजातीच्या चेतना परिषद उत्साहातविकासाच्या विविध पैलूवर मार्गदर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2018
Total Views |
 
 
 
जनजातीच्या चेतना परिषद उत्साहात
विकासाच्या विविध पैलूवर मार्गदर्शन
नंदुरबार , २३ डिसेंबर
देवगिरी कल्याण आश्रमातर्फे रविवार २३ रोजी सकाळी ९ वा .श्री शिवाजी नाट्यमंदिरात जनजाती चेतना परिषदेची सुरुवात उत्साहात झाली. परिषदेत जनजाती बांधवांच्या विविध समस्यांवर विचारविनिमय करण्यात आले.
 
यावेळी मंचावर केंद्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय, भारतीय नौसेना आयुध सेवेतील लक्ष्मणराजसिंह मरकाम, अ.भा. कल्याण आश्रमाच्या राष्ट्ीय उपाध्यक्षा नीलिमामाई पट्टे, सोलापूर येथील पोलीस अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि नाशिक पश्‍चिम महाष्ट्ाचे प्रांत सचिव प्रा.शरद शेळके,विशाखापट्टम येथील आयएएस अधिकारी शंकरसिंह , डॉ. राजकिशोर हलया, अध्यक्ष जनजाती सुरक्षा मंच , खा. हिनाताई गावीत, डॉ.प्रकाश ठाकरे , अध्यक्ष आयोजन समिती, आ. उदयसिंह पाडवी, चैत्राम पवार , प्रांताध्यक्ष वनवासी कल्याण आश्रम, मोवल्या गावीत ,प्रांत सहसचिव व.का.आश्रम, गणेश गावीत, प्रांत संघटनमंत्री व.क.आश्रम, प्रा.पुष्पाताई गावीत, डॉ.विरेंन्द्र वळवी , सहसचिव चेतना परिषद आदी उपस्थित होते.
 
या प्रसंगी मान्यवरांचे हस्ते विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यात आले.
प्रदर्शनी कक्ष उद्घाटन राजकिशोर हासदा केंद्रीय कार्यकर्ते व.क.आ. यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रदर्शनीत नंदुरबार जिल्ह्यातील सण, उत्सव, वारली पेंटींग,क्रांतीकारकांचे घटनाक्रम असलेले छायाचित्र, कल्याण आश्रमे प्रांतातील महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचा समावेश आहे.
 
शोभायात्रा उद्घाटन ना.नंदकुमार सायजी , लक्ष्मण मरका, खा.हिनाताई गावीत, प्रकाश ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आले.
जनजातीची संस्कृती नंदुरबार जिल्ह्यातील सण उत्सव,रामायणातील दृश्य यावर आधारित पेहराव व संस्कृतीक नृत्याचा समावेश आहे.
 
चेतना परिषद पहिले सत्राचे उद्घघाटन ना.नंदकुमार सायजी, खा.हिनाताई गावीत, आ.उदयसिंह पाडवी, डॉ.विशाल वळवी, राजेश हासदा यांच्याहस्ते करण्यात आले.
उद्घघाटन प्रसंगी गर्व हमे है इस धरतीपर हम सच्चे संतान है या संाघिक गीत व आप नंदुरबार गाव में या स्वागत गीत सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतना परिषदेचे सचिव डॉ.विशाल वळवी यांनी करतांना आयोजनाची भूमिका स्पष्ट केली.
तर आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश ठाकरे यांनी चेतना परिषदेचा हेतु स्पष्ट करतांना जनजाती समाजातील विविध प्रश्‍नांविषयी संवाद प्रक्रिया २००६ पासून चेतना परिषदेच्या माध्यमातुन सुरु केली आहे. विकासातील अनुरोध, पाचवी अनुसूची यावर चर्चा व्हावी जनजातींचे मुळ असलेल्या जल, जमीन आणि जंगल याविषयी जनजागृती व्हावी यासाठी ही परिषद असल्याचे सांगितले.
 
पुष्पाताई गावीत यांनी रावलपाणी च्या इतिहासाबद्दल माहिती सांगीतली.
लक्ष्मणराजसिंह मरकाम यांनी जनजातीबांधव हे हिंन्दूच आहे. त्यांच्या प्रथा, रीतिरिवाज , कुलदेवता हे चिरंतन आहेत. पण विदेशी आणि देशातील काही डाव्या शक्ती त्यांचे विभाजन करुन देशाचे तुकडे करण्याचे कारस्थान रचत आहेत.त्यातूनच रावण आमचा पूर्वज होता असे प्रवाद निर्माण केले जात असे परखड आणि आवेशपूर्ण प्रतिपादन त्यांनी केले.
 
 
असे होते कार्यक्रमाचे नियोजन
नोंदणी व अल्पोपहार सकाळी ८.३० ते ९.३०
शोभा यात्रा सकाळी ९.३० ते १०
उद्घाटन सत्र सकाळी १० ते १०.३०
प्रथम सत्र सकाळी १०.३५ ते ११.३५
व्दितीय सत्र ११.३५ ते १२.३५
भोजन दुपारी १ ते २
तृतिय सत्र दुपारी २.१५ ते ३.१५
चतुर्थसत्र व समारोप ३.४५ ते ५.००
चहापान सायंकाळी ५ ते ५.३०
 
 
आयोजन समिती
या परिषदेच्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश ठाकरे,चेैत्राम पवार, प्रांताध्यक्ष, देवगीरी कल्याण आश्रम, खा.हिनाताई गावीत, डॉ.विशाल वळवी, पुष्पाताई गावीत, आ.उदयसिंहदादा पाडवी, विरेंद्र वळवी, मौल्या गावीत, प्रा.छाया गावीत, मधुकर गावीत, गणेश गावीत, अर्चनाताई वळवी, रतिलाल कोकणी, जत्र्याबाबा पावरा, छबीताई वळवी, प्रा.डि.के.वसावे आदींचा यात समावेश होता.
 
@@AUTHORINFO_V1@@