बाला रफिकने मिळवला महाराष्ट्र केसरी किताब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2018
Total Views |



जालना : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत बुलडाण्याच्या बाला रफिकने बाजी मारली. पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य या स्पर्धेकडे होते. २२ वर्षीय रफिकने पुण्याच्या गतविजेत्या अभिजीत कटकेला ११-३ असे नमवत महाराष्ट्र केसरी किताबावर नाव कोरले. बाला रफिकने एकेरी पट, दुहेरी पट, ढाक या डावांचा अवलंब करुन अभिजितला निष्प्रभ केले.

 

सुरुवातील अभिजीत कटकेने आक्रमक चढाई करत बाला रफिकला थेट मैदानाबाहेर प्रेक्षकांमध्ये नेऊन पाडले. पहिला गुण झटपट मिळवल्याने कटके बालावर भारी पडणार असे दिसत होते. मात्र, त्यानंतर बालाने एका पाठोपाठ एक आक्रमक चढाया करत गतविजेत्या कटकेवर ११-३ अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला. विजयानंतर कोल्हापुरच्या स्वर्गीय वस्ताद गणपतराव आंदळकर यांना बाला रफिकने महाराष्ट्र केसरीची गदा समर्पित केली.

 

माती विभागात ९२ किलो वजन गटात नांदेडच्या अनिल जाधवने मुंबईच्या सुहास गोडगेला पराभूत करुन सुवर्णपदक जिंकले. गादी विभागात पुण्याच्या अक्षय भोसलेने कोल्हापूरच्या सिकंदर शेखला नमवून ९२ किलो वजन गटात सुवर्णपदक पटाकावले. या प्रसंगी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार राजेश टोपे, संतोष साबळे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे, प्राचार्य डॉ. दयानंद भक्त, आत्मानंद भक्त, डॉ. भागवत कटारे, संग्राम मोहळ, गणेश मोहळ, अनिल मोहळ आदी उपस्थित होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@