कोकणी समाजातर्फे कुलदैवत डोंगर्‍यादेवाचे पूजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

 
जळगाव : 
 
कोकणी समाजातील परंपरा म्हणजे डोंगर्‍यादेव (डोंगरगड) आदिवासींमधील ही एक जमात असून डोंगराची पूजा करतात. डोंगरदेव हे त्यांचे कुलदैवत. दरवर्षी कार्तिक महिना सुरू झाल्यापासून डोंगर्‍यादेवाचे पूजन केले जाते.
 
डोंगर्‍यादेव हे डोंगरात कड्या-कपार्‍यात, गुफांमध्ये असतो. त्याची पूजा हा समाज मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो.
कार्तिक महिन्याच्या सुरुवातीस गावकरी एकत्र येऊन त्यांच्यापैकी एक व्यक्ती डोंगर्‍यादेव निश्चित करून गड धरतो.
 
 
श्रद्धेनुसार तो मुधानी (निसर्गपूजक), भोपा माऊली (मुधानीचा साथीदार), पावरकर (पावरी वादक), टापरा, कथकरी तसेच प्रत्येक घरातील एकाला सुपारी देऊन आमंत्रित करतो.
 
 
कार्यक्रमाला सुरुवात होऊन त्या व्यक्तीच्या घरी गायीच्या शेणाने अंगण सारवतात. संध्याकाळी गावकरी त्या ठिकाणी जमून खळीच्या मध्यभागी पूजेचे विधी मांडतात.
 
 
त्यात तांदळाच्या सह्याने आकाश, चंद्र, सूर्य, धरती यांना साक्षी मानून दगड दिवा पेटवून त्यावर तुपाची धुपारी देऊन पूजापाठ करतात. त्यानंतर पहिल्या दिवसापासून ते पौर्णिमेच्या आदल्या दिवसापर्यंत प्रत्येक दिवशी अंगणात सर्व गावकरी आणि त्या थोमाला रिंगण करून मुधानी, भोषा माऊली, पावरकर, टापरा आणि गावातील सर्व देव माऊली (व्यक्ती) एकत्र येऊन डोंगर्‍यादेवाची गाणी म्हणत पायाचा ठेका देतात.
 
 
डोंगर्‍यादेवाची पूजा केली तर घरात, गावात सुख-शांती, निसर्गनिर्मित ऊन, वारा, पीक, पाऊस या दैवशक्तीपासून जीवसृष्टीचा बचाव होतो, असा समाजातील समज आहे.
@@AUTHORINFO_V1@@