भुसावळ पोलीस स्टेशनमध्ये युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |
भुसावळ : 
 
बाजारपेठ पोलीस ठाण्यात औरंगाबाद येथील 30 वर्षीय युवकाने गळ्यावर वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना 20 रोजी 8.45 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
 
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश साहेबराव जावरे (वय 30, रा.औरंगाबाद) हा 20 रोजी रात्री दारूच्या नशेत बाजारपेठ पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार यांच्यासमोर येथून उभा राहिला.
 
 
मला आत्महत्या करायची आहे, असे म्हणत त्याचे खिशातील ब्लेड काढून स्वत:च्या गळ्यावर सपासप दोन वार करुन गंभीर जखमी करुन घेतले. या घटनेमुळे काही काळ पोलीस ठाण्यात पोलिसांची धावपळ उडाली.
 
 
अत्यवस्थ आकाशला रिक्षातून येथील खासगी रुग्णालयात रवाना केले. मात्र, गंभीर जखमी असल्याने त्याला गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे उपचार सुरु आहेत. त्याने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचे कारण समजू शकले नाही.
 
 
घटनेची माहिती मिळताच प्रभारी डीवायएसपी सुभाष नेवे (मुक्ताईनगर) यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेची माहिती घेतली.
याबाबत बाजारपेठ पोलिसात ठाणे अंमलदार बालक बार्‍हे यांच्या फिर्यादीवरून आकाश जावरे याच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोउनि दत्तात्रय गुळीक करित आहे.
@@AUTHORINFO_V1@@