शशिकांत हिंगोणेकर यांच्या ‘ऋतूपर्व’ला राज्य पुरस्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

 
 
जळगाव : 
 
येथील जि.प.तील माजी शिक्षणाधिकारी आणि राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, लातूर येथील विद्यमान विभागीय सचिव कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या ‘ऋतूपर्व’ या काव्यसंग्रहाला 2017 चा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी दिला जाणारा स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार घोषित झाला आहे. त्यांना प्रौढ वाड्मय प्रकारासाठी रू. 1 लाखांचा कवी केशवसूत पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
 
 
महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी मराठीतील उत्कृष्ट वाड्मय निर्मितीसाठी स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार दिले जातात. त्या अनुषंगाने 2017 साठी राज्यातील सुमारे 35 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात कवि शशिकांत हिंगणेकर हे एक आहेत.
 
 
त्यांचे युध्द सुरू आहे, अंतर्भेदी, कवितेचे दिवस, बेट बंद भावनेचे, नवे स्वगत, छलचक्र, मोकळे आकाश आदी काव्यसंग्रह आहेत. याशिवाय त्यांनी संपादित केलेली अन्य पुस्तकेही आहेत.
 
 
कवी अनंत फंदी, अस्मितादर्श, कवी ना.घ.देशपांडे, बालकवी काव्य पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@