आधार पडताळणी झालेल्या शिधापत्रिकाधारकांनाच जानेवारीपासून धान्य वितरण : जिल्हाधिकारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

पात्र शिधापत्रिकाधारकांनी 25 डिसें.पर्यंत आधार पडताळणी करावी

 
 
 
जळगाव : 
 
 
जिल्ह्यात शासन निर्देशानुसार पात्र शिधापत्रिकाधारकांनाच अन्नधान्याचे वितरण करण्यात येते आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डिसेंबर 2018 हा महिना शिधापत्रिका व त्यातील सदस्य पडताळणी महिना म्हणून घोषित करण्यात आला आहे.
 
त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व रास्त भाव दुकानांमध्ये अन्न सुरक्षा कायद्यानुसार पात्र लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करताना सर्व शिधापत्रिकाधारकांची व त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार पडताळणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.
 
 
जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी पात्र शिधापत्रिकाधारकांनी आपल्याकडील आधार कार्डच्या प्रतिसह स्वस्त धान्य दुकानांमध्ये अथवा दुकानदार सदर कामासाठी गृहभेटी देतेवेळी उपस्थित राहून कुटुंबातील सर्व सदस्यांची 100 टक्के आधार पडताळणी 25 डिसेंबर 2018 पावेतो पूर्ण करुन घ्यावी.
 
 
माहे. जानेवारी 2019 पासून आधार पडताळणी पूर्ण केलेल्या शिधापत्रिकाधारकांनाच अन्नधान्याचे वितरण करण्यात येणार असल्याने त्यांनी या मोहिमेत सर्व रास्त भाव दुकानदारांना सहकार्य करावे.
 
 
या मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व तहसीलदार यांना सविस्तर सूचना देण्यात आलेल्या असल्याने याबाबतच्या अडचणीबाबत आपल्या नजीकच्या तहसील कार्यालयातील तहसीलदार अथवा पुरवठा शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@