भूजलाची योग्य स्वरूपात उचल झाली पाहिजे : डॉ. मईलस्वामी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

मू.जे.त भूजल व्यवस्थापनविषयी राष्ट्रीय परिषदेचा समारोप


 
 
जळगाव : 
 
भूजलाविषयी काम करणार्‍या व्यक्तींना प्रशिक्षण दिले पाहिजे. भूजलाची योग्य स्वरूपात उचल झाली पाहिजे, असे प्रतिपादन चेन्नई येथील डॉ. मईलस्वामी यांनी केले.
 
 
मू.जे.महाविद्यालयात जलश्री, भूगर्भशास्त्र, भूमाहितीशास्त्र विभागातर्फे भूजल व्यवस्थापनविषयी दोनदिवसीय राष्ट्रीय परिषद झाली. समारोपावेळी ते बोलत होते.
 
 
प्रसंगी हैदराबाद येथील डॉ.थांगराजन, औरंगाबाद येथील डॉ.पी.एस.कुलकर्णी, प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी उपस्थित होते. प्रसंगी युवा संशोधक म्हणून आयआयजीएम, नवी मुंबई येथील ताहिमा खान आणि रुडकी, उत्तराखंड येथील ब्रिजेशकुमार यादव या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.सूत्रसंचालन व आभार जलश्री केंद्राच्या संचालिका डॉ.स्वाती संवत्सर यांनी केले.
 
 
दिवसभरात डॉ.उदय कुळकर्णी यांनी पाझर तलाव कसे असावेत, याविषयी तर डॉ. स्वाती संवत्सर आणि डॉ.मिलिंद पंडित यांनी कोरडवाहू प्रदेशांत पाणी असण्याचा प्रभाव याविषयी सादरीकरण केले. तर भरतपूर, राजस्थान येथील सरिता मेहरा यांनी गावातील तलाव पुनर्जीवित कसे करावे, याविषयी सांगितले.
 
 
परिषदेसाठी डॉ.मिलिंद पंडित, डॉ.चेतन महाजन, समीर कुरेशी, भूषण जोशी, सुमित भावसार, भावेश पाटील, सरिता मेहरा, किरण पवार, मयूरी देशमुख, सोनाली कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@