शाळा, महाविद्यालये, संस्थांकडून संत गाडगेबाबांना अभिवादन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन, स्वच्छतेविषयी जागृतीसाठी रॅली

 
 
जळगाव : 
 
संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, संस्थांकडून गाडेगाबाबा यांना अभिवादन करुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच स्वच्छतेविषयी जागृती व्हावी या उद्देशाने शहरातून रॅली काढण्यात आली.

ज.सु.खडके विद्यालय
 
 
लोकशिक्षण मंडळ संचालित स्व.सै.ज.सु.खडके प्राथमिक विद्यामंदिरात संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त कब-बुलबुल पथकाची गुरुवारी रॅली काढण्यात आली. यावेळी स्वच्छतेविषयक घोषणा देत चौकाचौकात ‘असेल शौचालय ज्याचे दारी’ हे पथनाट्य सादर करण्यात आले. कासमवाडी, योगेश्वरनगर, श्रीकृष्णनगर, विठ्ठलपेठ या भागातून रॅली काढण्यात आली. नागरिकांकडून स्वच्छतेची सामूहिक शपथ घेत जाहीरनाम्यावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. रॅलीत मुख्याध्यापिका निर्मला चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यशस्वितेसाठी कर्मचारी, शिक्षकवृदांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पूनम पाटील व याकुब तडवी यांनी केले.
 
 
के.सी.ई अध्यापक विद्यालय
 
 
संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त के.सी.ई.सोसायटीचे अध्यापक विद्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्राचार्य डॉ. ए. आर. राणे व के. जी. फेगडे यांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. अध्यापक विद्यालयाच्या छात्राध्यापकांनी मू.जे.महाविद्यालय परिसरातील आणि अनंत गणेश मंदिर परिसराची साफसफाई केली. यावेळी डॉ. वंदना चौधरी, प्रा. केतन चौधरी, डी.एल.एड.विभागप्रमुख प्रा. डी. डी. भाटेवाल, प्रा. एच. टी. चौधरी, प्रा. एस. व्ही. झोपे, प्रा. स. एम. पाटील, एस.एस.तायडे, डॉ. डी. एस. पवार, प्रा.किसन पावरा उपस्थित होते.
 
 
आई जिजाऊ माता, रमाई फाउंडेशन
 
 
आई जिजाऊ, माता रमाई फाउंडेशन, मेहरूण कार्यालयात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणे योगेश सोनवणे यांनी माल्यार्पण केले. अध्यक्षस्थानी उमेश सपके हे होते. प्रमुख पाहुण्यांनी संत गाडगेबाबा यांचे विचार मांडले. यशस्वितेसाठी निलेश सपकाळे, सोनाली सपकाळे, मनषा पाटील, रुपाली पवार, कृष्णा तायडे, संजय अहिरे, अनिल सोनवणे, अनिल वानखेडे, दिलीप नेटके, अल्ताफ पठाण, ईश्वर वानखेडे, आनंद अहिरे, नरेंद्र सुरळके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ईश्वर ढिवरे यांनी केले.
 
 
जिल्हा परीट सेवा मंडळ
 
 
जिल्हा परीट (धोबी) सेवा मंडळातर्फे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त संत गाडगेबाबा युवा फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले. याप्रसंगी जिल्हा धोबी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठल सोनवणे, सचिव राजेश जाधव, माजी अध्यक्ष भास्करराव वाघ, जिल्हा लाँड्री व्यावसायिक असो.चे अध्यक्ष अरुण राऊत, धोबी समाज मंडळाचे संचालक दिलीप शेवाळे, सागर सपके, राजू सपके, गणेश सपके, प्रशांत मांडोळे, दिनकर सोनवणे, विजय शेवाळे, रमेश सूर्यवंशी, विजय सोनवणे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
 
 
उपस्थितांनी संत गाडेबाबा यांचे ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे भजन सामूहिकरीत्या म्हटले. दुपारी अन्नदानाचा कार्यक्रम संत गाडगेबाबा उद्यानात झाला. सायंकाळी शहरातील अंध, अपंग, भीक्षेकरी यांना अन्नदान करण्यात आले व परिसरात स्वच्छता अभियान राबवून संत गाडगेबाबा यांना आदरांजली वाहण्यात आली. यशस्वितेसाठी सुधाकर कापसे, मनोज वाघ, सोपान रायपुरे, अनिल वाघ, सुनील खर्चाणे, सतीश शेवाळे, चंद्रकांत वाघ, बारकू थोरात यांनी परिश्रम घेतले.
 
 
भा.का. लाठी विद्यामंदिर
 
 
ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटी संचालित भा.का.लाठी विद्यामंदिरात संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक गजमल नाईक यांच्या हस्ते गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपशिक्षिका मृणालिनी कोळी यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन व आभार वर्षा चौधरी यांनी केले. यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.
राज्य धोबी (परीट) महासंघ (सर्व भाषिक)
 
 
सार्वजनिक स्वच्छतेचे जनक व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करणारे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त मेहरूण येथे महादेव मंदिर परिसरात महाराष्ट्र राज्य धोबी (परीट) महासंघातर्फे (सर्व भाषिक) अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश कार्याध्यक्ष दीपक बाविस्कर यांनी मनोगत व्यक्त केले.
 
सुरुवातील गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला माजी उपनगराध्यक्ष वासुदेव सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. विठ्ठल सोनवणे, सुरेश ठाकरे, पांडुरंग सोनवणे, सर्जेराव बेडीस्कर, सुभाष शिरसाळे, ईश्वर सोनवणे, भूषण सोनवणे, उमेश सोनवणे, शंभू सोनवणे, तुषार सोनवणे यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@