लाचेची मागणी करणार्‍या सहायक पोलीस निरीक्षकास अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

 
जळगाव :
 
जावयास गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी आणि जावयाची ताब्यात घेतलेली मोटारसायकल परत देण्यासाठी दोन लाखाच्या लाचेची मागणी करणार्‍या अहमदनगरचे सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस नाईक यांना सापळा रचून पोलिसांनी ताब्यात घेतले.
 
 
अहमदनगर येथील तालुका पोलीस स्टेशनमधील सहायक पोलीस निरीक्षक किरण बाजीराव शिंदे आणि पोलीस नाईक आनंद भगवान सत्रे यांनी 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबरदरम्यान जप्त केलेली मोटारसायकल परत देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष दोन लाखाच्या लाचेची मागणी केली होती.
 
 
यासंदर्भात दोघांविरुद्ध भिंगार पोलीस स्टेशन येथे 21 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक श्याम पवरे, पोलीस उपअधीक्षक किशोर चौधरी, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आलोसे यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
@@AUTHORINFO_V1@@