साताऱ्यात भीषण अपघात ; ३ ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |



सातारा : सातारा - माण तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भोजलिंग येथील डोंगरावरुन जीप दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात ३ महिला जागीच ठार तर १२ जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सांगलीतील आटपाडी तालुक्यातील विटलापूरहून भाविक मोठ्या प्रमाणात भोजलिंगच्या डोंगरावर दर्शनासाठी आले होते.

 

म्हसवड पासुन १३ किलोमीटर अंतरावर जांभुळणी गावानजीक डोंगरमाथ्यावर भोजलिंग हे देवस्थान आहे. मंदीराकडे जाण्यासाठी जांभुळणी तसेच वळई गावाकडून रस्ते आहेत. जांभुळणीकडील डोंगर उतारावरुन खाली येत असताना जीप चालकाचा ताबा सुटून जीप खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. या अपघातात ३ महिला जागीच ठार झाल्या. तर इतर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. भोजलिंगाच्या दर्शनासाठी आलेले हे भाविक विठलापूर येथील असल्याचे माहिती मिळत आहे. जखमींना ग्रामीण रुग्णालय म्हसवड आणि साबळे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये मनिषा आटपाडकर, संतमाला कैलास आटपाडकर, सिंधू धोंडीबा गळवे यांचा समावेश आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@