थंडीनिमित्त विठू माऊलीला उबदार पोशाख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |



 
 
पंढरपूर : वाढत्या थंडीचा कडाका सर्वसामान्यांना जाणवू लागला आहे. पंढरपूरच्या विठू माऊलीला या थंडीचा कडाका बसू नये म्हणून विठू माऊलीच्या मूर्तीला उबदार रजई, शाल देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. थंडीच्या दिवसात प्रक्षाळपुजेनंतर विठूरायाच्या मूर्तीला हा उबदार पोशाख घालण्यास सुरुवात केली जाते.
 

विठ्ठल मंदिरात रात्रीच्या वेळी होणारी शेजारती झाल्यानंतर विठूराया झोपी जाण्यापूर्वी मूर्तीच्या डोक्याभोवती एका विशिष्ट पद्धतीने मुंडासे बांधले जाते. त्यानंतर विठू माऊलीच्या कानाला थंडी वाजू नये म्हणून उपरण्याची सुती कानपट्टी मूर्तीच्या कानाला बांधण्यात येते. विठ्ठल मूर्तीला डोक्यापासून पायापर्यंत पांढरा शेला देण्यात येतो. या शेल्यावर उबदार शाल आणि काश्मिरी रजई घातली जाते. विठूरायाच्या मूर्तीला थंडी वाजणार नाही याची काळजी याद्वारे घेण्यात येते. यानंतर विठ्ठल मूर्तीच्या गळ्यात तुळशीचा हार घातला जातो. मग विठ्ठल मूर्तीची आरती करून विठ्ठलाला निद्रेसाठी तयार केले जाते.

 

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात होणाऱ्या पहाटेच्या काकडच्यावेळी विठ्ठल मूर्तीवरील फक्त काश्मिरी रजई काढण्यात येते. बाकीचे उबदार कपडे तसेच ठेवले जातात. प्रक्षाळपूजेच्या दुसऱ्या दिवसापासून विठ्ठल मूर्तीला असा उबदार पोशाख करण्यास सुरुवात होते. होळीपर्यंत असा उबदार पोशाख विठूरायाला करण्यात येतो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@