शेफ विष्णू मनोहर रचणार नवा विश्वविक्रम!

    19-Dec-2018
Total Views |



 
 
 
मुंबई : फूट लांबीचा पराठा आणि लांबीचा कबाब, सलग ५३ तास कुकिंग आणि ३००० किलोची खिचडी शिजवण्याचा विश्वविक्रम केल्यानंतर आता सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे एक नवा विश्वविक्रम रचणार आहेत. तब्बल ३२०० वांगी वापरून ते वांग्याच भरीत बनवणार आहेत.
 
 
 
 

हा विश्वविक्रम २१ डिसेंबर रोजी जळगाव येथे शेफ विष्णू मनोहर करणार आहेत. या नव्या विक्रमासाठी शेफ विष्णू मनोहर यांनी फेसबुकवरून चाहत्यांच्या शुभेच्छा मागितल्या आहेत. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद केली जाणार आहे.

 
 
     माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/