बॅंक खात्यासाठी ‘आधार’ सक्ती नाही

    18-Dec-2018
Total Views |
 

नवी दिल्ली : नवीन बॅंक खाते सुरू करण्यासाठी आता आधार क्रमांक सक्तीचा राहणार नाही, नवे मोबाईल सिमकार्ड घेताना ग्राहकाची ओळख पटवण्यासाठीही आधार क्रमांक आवश्यक नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत टेलिग्राफ कायद्यात ही दुरुस्ती करण्यात आली आहे. प्रीव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यातही यावेळी सुधारणा करण्यात आली.

 

सप्टेंबर २०१८मध्ये सर्वोच्च न्यायालयाने आधार कार्डबाबत ऐतिहासिक निर्णय देताना खासगी कंपन्यांद्वारे लागू केलेल्या आधार ऑथेंटिकेशनवर प्रतिबंध घातला. यानंतर दूरसंचार कंपनी आणि फिनटेकने सर्वोच्च न्यायालयाने घातलेली ही बंदी उठवण्याची मागणी सरकारकडे केली होती. केंद्र सरकारने टेलिग्राफ कायद्यामध्ये दुरुस्ती करत त्यात शिथिलता आणली आहे. त्यामुळे आता नव्या नियमानुसार ग्राहकांना नवा मोबाइल फोन घेताना आणि बँक खाते उघडताना १२ अंकी आधार क्रमांक देण्याची सक्ती राहणार नाही.

 

तुम्हाला वाटलं तरच आधार क्रमांक द्या...

 

मोबाईल कंपन्या आणि बॅंकांनी पुरावे म्हणून मागितल्यास स्वेच्छेनेच ग्राहक आधार क्रमांक देऊ शकतात. बॅंकांना किंवा मोबाईल कंपन्यांना आधार कार्ड सक्ती करण्याचा हक्क नाही.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/