जीवन रक्षक अटल जीवन रुग्णसेवेचे लोकार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018
Total Views |

आमदार उदेसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रम


 
तळोदा :
 
तळोदा व शहादा विधानसभा मतदार संघाकरिता आमदार पाडवी यांच्या प्रयत्नातून अत्याधुनिक सुविधा असलेली जीवन रक्षक अटल जीवन रुग्णसेवेचे लोकार्पण आमदार उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
 
 
तालुक्यातील लोकसंख्या पाहता तळोदा तालुक्यातील रुग्ण आणणे व नेण्याची जबाबदारी केवळ 4 रुग्णवाहिकावर आहे. परिणामी अनेकवेळा रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना जादा पैसे खर्चून खाजगी वाहनाचा सहारा घ्यावा लागतो.
 
 
यावर मार्ग काढत आमदार निधीतून अत्याधुनिक सुविधा असलेली (कार्डीयाक)अटल जीवन रुग्णवाहिका देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा तळोदा नगरपरिषदच्या प्रांगणात पार पडला.
 
 
यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी, मुख्यधिकारी जनार्दन पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी महेंद्र चव्हाण, भाजपा तालुका अध्यक्ष श्यामसिंग राजपूत, योगेश चौधरी, नगरसेवक योगेश पाडवी, रामा ठाकरे, अमानुदिन शेख, हेमलाल मगरे, बांधकाम सभापती भास्कर मराठे, जालधर भोई, नितीन पाडवी, सुरेश पाडवी, मुकेश बिरारे, दिपक चौधरी, वैद्यकीय अधिकारी महेंद्र पाटील, डॉ.असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गिरणार व सदस्य उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना आमदार पाडवी म्हणाले की, निवडून आल्यापासून रुग्णवाहिका मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो. मात्र वेळोवेळी शासनाचे बदलत्या धोरणांमुळे अडचणींना सामोरे जावे लागत होते.
 
 
मात्र पालिकेने देखभालीसाठी पुढाकार घेतला व नाहरकत दिल्यामुळे आमदार निधीतून ही अत्याधुनिक कार्डीयाक (जीवरक्षक) रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. याकरिता पालिका खर्चास कमी पडली तर रुग्णवाहिकेचा संपूर्ण खर्च स्वतः करणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले.
 
 
माझ्या पतींनीचे तबेत बरी नसताना मला रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. मी लोकप्रतिनिधी असताना मला समस्यां येऊ शकतात तर सर्व सामन्यांना किती त्रास होत असेल याची जाणीव मला झाली व वेळोवेळी पाठपुरावा करून अत्याधुनिक सुविधा असलेली रुग्णवाहिका मंजूर केली.
 
 
तसेच मयताना नेण्यासाठी 7 लाखाची शव वहिनी शहरासाठी मंजूर आहे. तर नगराध्यक्ष अजय परदेशी बोलताना म्हणाले की, 23 डिसेंबर रोजी सत्तास्थापनेला एक वर्ष पूर्ण होणार आहे.
 
 
सुरुवातीला आम्ही अमरधाम मध्ये मयताला लागणारा खर्चाची मोफत सुविधा दिली. आता रुग्णांना वाचवण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध केली आहे. ही रुग्णवाहिका केवळ तळोद्यासाठी द्यावी शहादा करिता नवीन रुग्णवाहिकाची सोय करावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
 
तर मुख्याधिकारी जनार्दन पवार यांनी सांगितले की, पालिकेच्या वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येत्या काळात शववाहिनी सुद्धा येणार आहे. याबाबतचा खर्चची जबाबदारी पालिका घेणार आहे यासाठी पैसा कमी पडू देणार नसल्याचे आश्वसन दिले.
 
 
दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण, मुख्यधिकारी जनार्दन पवार, आरोग्यदूत मुकेश बिरारे, आदींनी मनोगत व्यक्त केले तर डॉ.असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गिरणार यांनी खाजगी डॉ.वेळोवेळी आपणास मदत करतील असे आश्वासन दिले. कौशल सवाई यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार हेमलाल मगरे यांनी मानले.
अशी आहे अंबुलेन्स
 
अत्याधुनिक सुविधा असलेली 16 लाख रु किमतीची डी. एस फोर्स कंपनीची ही रुग्णवाहिका असून जिल्ह्यातील एकमेव रुग्णवाहिका असल्याचा दावा आहे.
 
रुग्णवाहिका ही वातानुकूलित असून यात प्रथमोपचार किट, कुत्रीम श्वासोच्छ्वास यंत्र, रक्तदाब तपासणी यंत्र, इलेक्ट्रॉनिक सी. पी.आर एस साधन, ऑक्सिजन सिलेंडर, जीवन रक्षक औषधीचा साठा असणार आहे.
 
तळोदा शहरातील डॉ भीमसिंग गिरासे, डॉ.बडगुजर व डॉ.लक्ष्मीकांत चौधरी यांनी रुग्णवाहिकेत मोफत सेवा देण्याचे जाहीर केले.
@@AUTHORINFO_V1@@