बोदवड तालुक्यात विकास कामासाठी 1 कोटी 58 लाख मंजूर

    17-Dec-2018
Total Views |

आ.एकनाथराव खडसे, खा.रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याला यश

 
 
बोदवड : 
 
तालुक्यात विविध विकास कामासाठी मुलभूत सुविधा अंतर्गत 1.58 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी माजी महसूल मंत्री आ. एकनाथराव खडसे, खा.रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नानी ग्रामिण भागातील गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे अंतर्गत बोदवड तालुक्यातील रस्ते, सौर पथदिवे बसविण्यासाठी ग्रामविकास व पंचायत राज विभाग यांच्याकडील शासननिर्णयानुसार विकास कामांना मंजूरी देण्यात आली आहे.
 
तालुक्यातील गावांतर्गत रस्ते , हायमास्ट लॅम्पच्या मागणीनुसार आ.एकनाथराव खडसे, खा. रक्षाताई खडसे यांनी पाठपुरावा केला. या कामांना लवकरच सुरूवात होणार आहे.
 
12 लाखांच्या निधीतून बोदवडला हायमास्ट लॅम्प बसविणे, भानखेडा येथे 6 लाखातून अंतर्गत रस्ता क्रॉकीटीकरण करणे, सोनोटी येथे 6 लाखातून रस्ता क्रॉक्रीटीकरण व गटार बांधकाम, 8 लाखातून चिंचखेडे सिम येथे विठ्ठल मंदिरानजिक रंगमंच बांधकाम, वरखेडे खुर्द येथे 8 लाखाचे सभामंडप बांधकाम करणे, नाडगाव येथे 9 लाखातून अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे, हरणखेडे रंगमंच बांधकाम (10लाख), एणगाव अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे(3लाख ), राजूरला हायमास्ट लॅम्प बसविणे (2 लाख), मनुर खु., बु. अंतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे प्रत्येकी (6 लाख), जलचक्र बु. शेवगे खु. स्मशानभूमी बांधकाम करणे प्रत्येकी (3 लाख), लोणवाडी, जामठी, येवती, रेवती, वराड खुर्द अंतर्गत रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे प्रत्येकी 6 लाख, सुरवाडे स्मशानभूमी बांधकाम, पेव्हर ब्लॉक (9लाख) मानमोडी पेव्हर ब्लॉक, सामाजिक सभागृह (17 लाख), पाचदेवळी स्मशानभूमी बांधकाम करणे(3लाख), कोल्हाडी रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे ( 6 लाख), पेव्हर ब्लॉक रंगमंच बांधकाम (9 लाख), साळशिंगी हायमास्ट लॅम्प बसविणे (1 लाख), चिंचखेडे प्र.बो.हायमास्ट लॅम्प बसविणे (1 लाख) अशा 1 कोटी 58 लाखातून विविध विकास कामे होणार आहेत.