रघुवंशी प्राथमिक विद्यामंदिरात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |

 
 
नंदुरबार : 
 
गोवर-रुबेला रोगाचे उच्चाटण करण्यासाठी शासनातर्फे गोवर-रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.
 
सदर मोहीम पार पाडण्यासाठी तसेच पालकांमध्ये याविषयीची जनजागृती करण्यासाठी येथील कै.मो.क.रघुवंशी प्राथमिक विद्यामंदिरात रुबेला-गोवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे मोलाचे सहकार्य लाभले.
 
 
यावेळी रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष शब्बीरभाई मेमन, सदस्य व पालक उपस्थित होते. मुख्याध्यापक मनोज गायकवाड यांनी लसीकरणाचे महत्त्व सांगून आरोग्य पथक, रोटरी क्लब व पालकांचे स्वागत केले. यावेळी कार्यक्रम यशस्वितेसाठी वैशाली पाडवी, वसुमती नेरे, अकिल शेख, शुभांगी माळी, यशवंत बोरसे, राहुल झाल्टे, दिनकर सावळे, अनिता गायकवाड शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@