वैजनाथ पाटीलची जामिनावर सुटका

    11-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई : मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला करणारा वैजनाथ पाटील याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. अॅ.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर वैजनाथ पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाबाहेर हल्ला केला होता. त्यानंतर पोलीसांनी वैजनाथ पाटील याला अटक केली होती. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना सुरक्षा देण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले होते.
 
गुणरत्न सदावर्ते यांना येणाऱ्या धमक्यांबद्दलही त्यांनी सांगितले होते. अशाप्रकारे धमक्या देणे हे साफ चुकीचे असल्याचे न्यायालयाने दोन्ही पक्षांना सांगितले. दरम्यान गुणरत्न सदावर्ते यांच्यावर न्यायालयात पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला. कोणत्याही व्यक्तीला आपले मतरप्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. तसेच न्यायालयातील जबाबदार व्यक्तीवर अशाप्रकारे पक्षापातीपणाचा आरोप करणे योग्य नाही. असे न्यायालयाने स्पष्ट केले. वैजनाथ पाटील हा जालना जिल्ह्यातील रहिवाशी असून तो घनसांगवी तालुक्यातील मुरमा गावचा आहे. वैजनाथ हा पदवीधर असून तो गेल्या चार महिन्यांपासून नोकरीच्या शोधात होता.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/