एड्सबाबतचे गैरसमज दूर करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |

नवापूरला उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक कैलास माळी यांचे प्रतिपादन


 
नवापूर : 
 
एड्स हा आजार भयानक नसून गंभीर व संवेदनशील असून ए.आर.टी.औषध उपचाराने व सकारात्मक जीवनशैली अंगिकारली तर या आजारावर मात करून सर्वसामान्य आयुष्य जगता येते,
 
ह्याचा प्रसार प्रामुख्याने असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होत असल्याने या आजाराविषयी समाजात अनेक गैरसमज पसरलेले असल्याचे प्रतिपादन नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक कैलास माळी यांनी केले.
 
 
ते एड्स जनजागृती सप्ताहनिमित्त तालुक्यातील करंजी येथील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.ते म्हणाले की, युवकांनी विवाहापूर्वी ब्रह्मचर्य पालन केले आणि विवाहानंतर आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहिले तर त्यांना कधीही एच.आय.व्ही.चा संसर्ग होणार नाही.
 
दूषित सीरिंग्ज यांचा वापर टाळावा, एचआयव्ही दूषित रक्तदान टाळावे. प्रत्येकाला एच.आय.व्ही टेस्टचा रिपोर्ट माहिती असावा. त्यासाठी एच.आय.व्ही तपासणी करणे गरजेचे आहे. सामान्य आयुष्य जगता येते...
 
एचआयव्ही एड्स बाधित रुग्णासोबत भेदभाव न करता त्याला उपचारासह सामाजिक, मानसिक आधार दिला तर तो आपल्यासारखे सामान्य आयुष्य जगू शकतो, असे त्यांनी सांगितले.
 
 
विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शनाचा लाभ घेवून अनेक शंका विचारल्या आणि त्यांच्या शंकांचे निरसन कैलास माळी यांनी केले.
माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय करंजी येथे वैद्यकीय अधिक्षक डॉ.कीर्तीलता वसावे व मुख्याध्यापक एस.डी.घरटे यांच्या मार्गदर्शनाखाली एच.आय.व्ही.-एड्स जनजागरण अभियानाअंतर्गत व्याख्यान आणि पोस्टर प्रदर्शन झाले. अध्यक्षस्थानी श्री. मूजगे होते.
 
महेश पूरकर यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र गिरासे यांनी एड्स विषयी माहिती दिली.सूत्रसंचालन मनोज पगारे यांनी केले तर आभार राजधर जाधव यांनी मानले.
@@AUTHORINFO_V1@@