हिंदु राष्ट्र स्थापना काळाची गरज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2018
Total Views |

नंदुरबारला हिंदु राष्ट्र जागृती सभेत ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांचे प्रतिपादन



 
 
नंदुरबार : 
 
राज्यकर्त्यांवर दुष्ट प्रवृत्तीचा प्रभाव वाढलेला असल्याने वर्तमान स्थितीत राष्ट्रभक्त घडवणार्‍या योजनांचा अभाव आहे. त्यामुळे राष्ट्रीय चिंतन थांबले आहे.
 
भारताला अध्यात्मिक नेतृत्व करण्याची क्षमता असतांनाही आध्यात्मिक अंग मृतवत होत चालले आहे. म्हणूनच हिंदूराष्ट्र स्थापन होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मुंबईचे लष्कर-ए-हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी केले.
 
 
हिंदू जनजागृती समिती आयोजित हिंदू राष्ट्र जागृती सभा रविवार 9 डिसेंबर रोजी जुने पोलीस ग्राउंड येथे पार पडली. ही समितीची नंदुरबार जिल्ह्यातील 15 वी सभा होती. सभेला सनातन संस्थेचे अभय वर्तक, , हिंदू जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी मार्गदर्शन केले. महिला आणि पुरुषांनी या सभेला हजेरी लावली.
 
 
पुरोगाम्यांच्या दबावाखाली तपास यंत्रणा निरपराध हिंदू तरुणांना लक्ष्य करीत आहेत. या पुरोगामी वैचारिक आतंकवादाला सनातन संस्था हाणून पाडेल आणि हिंदूराष्ट्र स्थापन करेल.
 
नालासोपारा स्फोटक जप्ती प्रकरणात हेतूत: सनातन संस्थेचे नाव गोवले जात आहे. पुरोगामी शक्ती बेकायदेशीरपणे त्यासाठी दबाव आणत आहेत. कोणत्याही न्यायालयाचा निकाल येण्याअगोदरच बंदी आणण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.
 
 
उच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून दहशतवादविरोधी पथक खोटी विधाने असलेली प्रसिद्धीपत्रके सातत्याने प्रसिद्ध करत आहे. या सर्व त्रासांविरोधात सनातनचा लढा सनदशीर मार्गाने चालूच राहील, असा इशारा सनातन संस्थेचे अभय वर्तक यांनी दिला.
 
 
’हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि सुराज्य अभियान’ या विषयावर प्रशांत जुवेकर म्हणाले की, ’शासकीय कार्यालयात देवतांच्या प्रतिमा नसाव्यात असा आदेश वर्ष 2002 मध्ये काढण्यात आला होता.
 
आता पुन्हा 2017 ला महाराष्ट्र शासनाच्या एका विभागाने पुन्हा हा आदेश काढला आहे. शासकीय कार्यालयांत जर देवतांच्या प्रतिमा चालत नाहीत मात्र निधर्मीवाद राबवणार्‍या शासनाला त्याच हिंदू देवतांच्या मंदिरांचा निधी सरकारला कसा चालतो ? हा कोणता निधर्मीवाद आहे ?
 
 
महाराष्ट्रासह नंदुरबार जिल्ह्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतरणाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. माजी न्या. धर्माधिकारी यांच्या समितीने 2014 साली मध्यप्रदेश अन ओडीसाच्या धर्तीवर महाराष्ट्र धर्मातर बंदी कायदा लागू करावा, अशी शिफारस केली होती. परंतू कार्यवाही झालेली नाही.
 
 
‘धर्मातर बंदी कायदा लागू झालाच पाहिजे’, अशी मागणी एकमुखाने करावी ! त्यासाठी गरिकांनी पत्र मोहीम छेडावी’, असे जाहीर आवाहन जुवेकर यांनी केले.
 
 
सभेला श्रेयस पिसोळकर यांनी केलेल्या शंखनादाने प्रारंभ झाला. सनातनचे संत सदगुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वालनझाले.
 
ईश्वरप्रसाद खंडेलवाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर वेदमूर्ती. योगेश गव्हाले यांनी वेदमंत्रपठण केले. आढावा डॉ. नरेंद्र पाटील यांनी मांडला. सूत्रसंचालन रागेश्री देशपांडे यांनी
केले.
@@AUTHORINFO_V1@@