तळोद्यात उद्या भोई समाजाचा राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2018
Total Views |

माळी समाज मंगल कार्यालयात आयोजन

 
तळोदा :
 
तळोदा येथे2 डिसेंबर रोजी भोई समाजाच्या राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन तळोदा येथील माळी समाज मंगल कार्यालयात करण्यात आल्याची माहिती नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष लक्ष्मण वाडिले व वधु-वर परिचय समितीचे अध्यक्ष धनलाल शिवदे यांनी दिली.
 
ते म्हणाले की मेळाव्यात वधू परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येईल. समाज बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या सत्रात सकाळी 9 ते 12 दरम्यान मान्यवरांचा सत्कार तसेच प्रमुख प्रमुख पाहुण्यांचे मनोगत होईल.
 
दुपारी 12 ते 2 यादरम्यान भोजनासाठी राखीव असेल. दुपारी 1 ते 5 या वेळेत वधु-वरांचा परिचय होईल. मेळाव्यास महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश आदि राज्यातील समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.
 
तरी राज्यातील समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवार या मेळाव्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन नंदुरबार जिल्हा भोई समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वाडिले सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. रवींद्र वानखेडे, तळोदा वधु वर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष डी. ओ. भोई यांनी दिलेल्या प्रसिद्धि पत्रकात केले आहे.
 
या वेळी त्यांनी कार्यक्रमाच्या जागेची पाहणी केली.तळोदा येथील भोई समाज पंच मंदिरात बैठक घेऊन कार्यक्रमासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या असल्याचीही माहिती त्यांनी या वेळी दिली.
@@AUTHORINFO_V1@@