स्थानिक स्वराज्य संस्थांनी सबलीकरणाला प्राधान्य द्यावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2018
Total Views |

ना.भुसे यांच्या बैठकीत अधिकार्‍यांना सूचना

 
 
 
धुळे : स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नि:समर्थ व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात येणार्‍या निधीतून संबंधित व्यक्तीचे सबलीकरण करण्यात यावे, त्यांना रोजगारासाठी साधने उपलब्ध करून दिली जावी, अशी सूचना ग्रामविकासमंत्री दादा भुसे यांनी समाजकल्याण विभागाच्या अधिकार्‍यांना दिली.
 
ना. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात स्थानिक स्वराज्य संस्थांकडून नि:समर्थ व्यक्तींसाठी राखीव ठेवण्यात येणार्‍या पाच टक्के निधीचे नियंत्रण करण्यासाठी गठीत जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली.
 
या वेळी जिल्हाधिकारी रेखावार, महापालिकेचे आयुक्त देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी., जिल्हा समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, सदस्य कविता गजेंद्र पाटील, संजय सोनवणे, सुनील पाटील, लक्ष्मण पानपाटील, शशिकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
 
ना. भुसे म्हणाले की, जिल्ह्यातील चारही तालुक्यांना समान निधीचे वितरण करावे. तो वितरित करताना रोजगार निर्मिती होईल, त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचा निर्वाह होईल, असे नियोजन करावे.
 
जिल्ह्यातून 179 प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी 66 प्रस्ताव पात्र ठरल्याची माहिती समाजकल्याण अधिकारी बडगुजर यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@