‘दी गॉड पार्टिकल’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



‘हिग्ज बोसॉन’ हा मूलकण भौतिकशास्त्राच्या प्रमाण प्रतिकृतीमधील एका कणाचा प्रकार असून हा कण अस्तित्वात असावा, असे भाकीत १९६४ सालीच वर्तवण्यात आले होते. याचाच शोध अनेक शास्त्रज्ञ घेत होते. त्यातीलच एक महत्त्वाचे नाव होते ते म्हणजे डॉ. लियोन यांचे.


‘दी गॉड पार्टिकल’ हे जगभरात गाजलेले पुस्तक. या पुस्तकाच्या अनेक आवृत्याही निघाल्या. १९८८ मध्ये म्युऑन न्यूट्रिनोच्या शोधाबद्दल ‘त्यांना’ भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला होता. असं जगभरातील जाणतं व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. लियोन लिडरमन. जिनिव्हाजवळील एका प्रयोगशाळेत अनेक प्रयोग करण्यात आले. त्यानंतरच ‘गॉड पार्टिकल’ म्हणजेच ‘हिग्ज बोसॉन’चे अस्तित्व सिद्ध झाले होते. हिग्ज बोसॉन हा मूलकण भौतिकशास्त्राच्या प्रमाण प्रतिकृतीमधील एका कणाचा प्रकार असून हा कण अस्तित्वात असावा, असे भाकीत १९६४ सालीच वर्तविण्यात आले होते. याचाच अनेक शास्त्रज्ञ शोध घेत होते. त्यातीलच एक महत्त्वाचे नाव होते ते म्हणजे, डॉ. लियोन यांचे. गेल्याच महिन्यात त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि एक गॉड पार्टिकलच आपल्यातून दूर गेल्याचे जाणवू लागले. डॉ.लियोन यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. लियोन यांचा जन्म १५ जुलै, १९२२ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये झाला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी रसायन शास्त्रातून शिक्षण घेत आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यातच तो काळ म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा. या कालावधीत त्यांनी अमेरिकन सैन्याची वाट धरली आणि तीन वर्षे अमेरिकन सैन्यात सेवा बजावली. यावेळी त्यांनी भौतिकशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. या विषयात त्यांची रूची वाढत गेल्यामुळे त्यांनी सैन्य दलातील नोकरीचा राजीनामा दिला आणि कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. यानंतर लियोन यांनी फेलो म्हणून फोर्ड फाऊंडेशनमध्ये काम केले. त्यानंतर त्यांच्यावर फर्मिलॅबच्या संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. याच ठिकाणी त्यांना संशोधनात मोठ्या प्रमाणात वाव मिळाला. तसेच विज्ञानविषयक चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला होता. कालांतराने त्यांच्या खांद्यावर ‘अमेरिकन असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. यातच आणखी एक महत्त्वाची चळवळ सांगायची ती म्हणजे, ‘फिजिक्स फर्स्ट.’ शालेय अभ्यासक्रमात रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांच्या तुलनेत भौतिकशास्त्रालाही प्राधान्य देण्यात यावे, या मागणीसाठी काही शास्त्रज्ञांनी ‘फिजिक्स फर्स्ट’ ही चळवळ सुरू केली होती आणि डॉ. लियोन हे या चळवळीचे प्रमुख होते. सर्वसामान्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी वाढावी, असा त्यांचा अट्टाहास असे. यासाठी पुस्तके लिहिली पाहिजेत, असेही ते म्हणत असत.

 

लियोन यांनी लिहिलेले गॉड पार्टिकल’ हे पुस्तक जगभरात सर्वाधिक गाजले. त्यांच्या या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्यादेखील निघाल्या. त्यांनी हिग्ज बोसॉनला ‘गॉड पार्टिकल’ असे संबोधले होते. ते भौतिकशास्त्राच्या स्थापनेशी निगडीत असलेले तत्त्व आहे आणि अद्यापही विज्ञानाच्या पलीकडे आहे, असे त्यांचे म्हणणे होते. ब्रिटिश शास्त्रज्ञ पीटर हिग्ज आणि भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रदास बोस यांच्या नावावरून ‘हिग्ज बोसॉन’ हे नाव देण्यात आले होते. १९८८ साली लियोन यांना म्युऑन न्यूट्रिनोच्या शोधाबद्दल भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. या शोधात मेल्विन श्वार्त्झ आणि जॅक स्टीनबर्गर यांचादेखील सहभाग असल्यामुळे हा पुरस्कार तीन शास्त्रज्ञांमध्ये विभागून देण्यात आला होता. याव्यतिरिक्त वूल्फ पारितोषिक, अर्नेस्ट ओ लॉरेन्स पदक असे अनेक पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. विज्ञानविषयक धोरणांवर चर्चा व्हावी, असे त्यांचे मत होते. यासाठीच अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारांनी देशातील विज्ञानविषयक आव्हानांवर चर्चा करावी, असे लियोन यांना वाटत होते. लियोन यांचा अखेरचा काळ अतिशय खडतर अशा परिस्थितीत गेला. त्यांना अखेरच्या काळात एका असाध्य रोगाने ग्रासले होते. तसेच यासाठी होणारा खर्चही त्यांना परवडणारा नव्हता. हा खर्च भागवण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले होते. याच परिस्थितीत त्यांना आपले नोबेल पारितोषिक विकून आपल्या उपचाराचा खर्च भागवावा लागला होता. विज्ञानाप्रती त्यांची असलेली निष्ठा ही सर्वांच्याच परिचयाची होती. त्यांचे या क्षेत्रातील कामही सर्वांना थक्क करणारे असेच होते. त्यांनी आपल्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळवले आणि संशोधनही केले. येणाऱ्या पिढ्यांसाठी तसेच विज्ञानाची गोडी असलेल्यांसाठी ते एक आदर्श होते आणि यापुढेही राहतील, यात काही शंका नाही. हिग्ज बोसॉनच्या संशोधनात महत्त्वाचे कार्य करणाऱ्या लियोन यांचे ३ ऑक्टोबर रोजी वयाच्या ९६ वर्षी निधन झाले. लियोन यांचे या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आणि मोठे होतेच. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांसाठी त्यांचे अफाट कार्य नक्कीच मार्गदर्शक राहील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@