शबरीमला मंदिराबाहेर हिंसाचार

    06-Nov-2018
Total Views |

 


 
 
केरळ : शबरीमला मंदिराच्या परिसरात कडोकोट बंदोबस्त असूनही आज सकाळी तेथे हिंसक आंदोलन झाले. या आंदोलनादरम्यान एका महिलेला मारहाण करण्यात आली. यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली. १० ते ५० या वयोगटातील महिला अय्यपा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे कळल्यानंतर भक्तांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
 

या हिंसक आंदोलकांकडून तेथील स्थानिक वृत्तवाहिनीच्या ड्रायव्हर आणि कॅमेरामनलाही मारहाण करण्यात आली. मारहाण झालेल्या महिलेचे नाव ललिता असून त्या थ्रिसूर येथे राहतात. ललिता या ५२ वर्षीय असून त्या आपल्या कुटंबासोबत मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. नंतर पोलीस संरक्षणात ललिता यांना मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली.

 

या मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात यावा. असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला तेथे मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे. या रविवारपासून शबरीमला मंदिर, पंबा, निलक्कल येथील तळांवर १४४ हा कलम लागू करण्यात आला आहे. मंगळवार रात्रीपर्यंत हे मंदिर बंद होईपर्यंत हा कलम लागू राहिल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/