जळगाव :
महाराष्ट्र युनिव्हर्सिटी अॅण्ड कॉलेज लायब्ररियन (मुक्ला) या संघटनेतर्फे ग्रंथालय, माहितीशास्त्र विषयावर 30 नोव्हें. व 1 डिसें. रोजी सकाळी 9 ते सायं.5 दरम्यान सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
इंडियन लायब्ररी असोसिएशयन (आय.एल.ए) या देशव्यापी संघटनेचेही या आयोजनात सहभाग आहे. अध्यक्ष म्हणून जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल राव आणि प्रमुख उद्घाटक प्र. कुलगुरू पी.पी.माहुलीकर हे मार्गदर्शन करणार आहे.
परिषदेस देशभरातून ग्रंथालय आणि माहितीशास्त्र क्षेत्रात कार्यरत असणारे अनेक व्यावसायिक आपली उपस्थिती देणार आहे. या क्षेत्रातील होणार्या अनेक नवनवीन विषयांवर विविध तज्ज्ञांकडून मार्गदर्शन व शोधनिबंधही प्रस्तुत केले जाणार आहे.
या परिषदेत जास्तीत जास्त ग्रंथपालांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन परिषदेचे आयोजक डॉ. मोहन खेरडे, अध्यक्ष, मुक्ला व संचालक, व ज्ञानस्त्रोत केंद्र संत अमरावती विद्यापीठ, अमरावती, तसेच मुक्ला क.ब.चौ.उ.म.वी.चे सेक्शनल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ.दिलीप देशमुख, उपाध्यक्ष शिरीष झोपे, परिषद आयोजन सचिव डॉ.विनय पाटील, सहसचिव डॉ.चंद्रशेखर वाणी, ट्रेझरर सुनील पाटील यांनी केले आहे.