गॅस सिलेंडर १३४ रुपयांनी स्वस्त

    30-Nov-2018
Total Views |
 
 

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅस किमतींच्या घसरणींमुळे शुक्रवारी विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये घट करण्यात आली आहे. १३४ रुपयांनी विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत असल्याने ही घट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 
इंडियन ऑईलने दिलेल्या माहितीनुसार, विना अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत ९४२ रुपये ५० पैसे होती. १ डिसेंबरपासून त्याची किंमत ८०९.५० रुपये असणार आहे.
 

दरम्यान अनुदानित सिलेंडरच्या किमतीत ६.५३ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत ५०७.४२ रुपये आहे. १ डिसेंबरपासून त्यासाठी ५००.९० रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान केंद्र सरकारकडून या सिलेंडरवर ३०८.६० रुपयांचे अनुदान दिले जात आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121