दुसर्‍या जिल्ह्यासह राज्यात जाणारा चारा विक्री थांबवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |
शेतकर्‍यांचे तहसीलदारांना निवेदन; नंदुरबारमध्ये चाराबंदी

 
 
तळोदा, 2 नोव्हेंबर- नंदुरबार जिल्ह्यात चाराबंदी लागू असतानादेखील परजिल्ह्यात व परराज्यात होणार्‍या चारा विक्रीवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन तळोदा तालुक्यातील पशुमालकांनी तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्याकड़े एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
 
 
 
निवेदनात नमूद केले की, आगामी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नंदुरबार जिल्ह्यात चारा बंदी लागू केली असताना तळोदा तालुक्यातून शेजारील गुजरात, मध्य प्रदेश या राज्यातील तसेच इतर जिल्ह्यातील चारा व्यापारी पशुमालक जास्तीचा दर देऊन चारा जिल्ह्याबाहेर व परराज्यात सर्रास विक्रीसाठी नेतात. याकड़े पोलीस व महसूलने पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. तालुक्यातून रोज़ शेकडोच्या संख्येने ट्रक भरून चारा गुजरात, मध्य प्रदेश व इतर जिल्ह्यात जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
 
 
अवैध चारा विक्री होत असल्यास त्याची माहिती देण्यासाठी पोलीस आणि महसूल प्रशासनाने संपर्क क्रमांक द्यावा जेणेेकरून अवैध चारा विक्रीची माहिती स्थानिक पशुमालक त्यांना देऊ शकतील आणि प्रशासनाने पथक नेमून अशा प्रकारे चारा खरेदी करुन परराज्यात जिल्ह्याबाहेर घेऊन जाणार्‍यांवर कारवाई करावी, अशीही मागणी पशुमालकांनी केली आहे. अन्यथा तळोदा तालुक्यातील पशुमालक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही पशुमालकांनी दिला आहे.
 
 
निवेदनावर प्रशांत मगरे, मयूर सूर्यवंशी, मुकेश महाजन, पिंटू भरवाड, रणछोड़ भरवाड, दिग्विजय माळी, विनोद माळी, योगेश शांताराम मराठे, राजेंद्र पुंडलिक भोई, संदीप चित्रकथे, यांच्यासह तळोदा तालुक्यातील पशुमालकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@