तळोदा-शहादा मतदारसंघात आ.उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते 12 कोटी 21 लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |
 
 
 
 
तळोदा, 2 नोव्हेंबर- तळोदा-शहादा मतदारसंघाचे आ. उदेसिंग पाडवी यांनी शुक्रवार 2 रोजी तळोदा तालुक्यात 12 कोटी 21 लाखांच्या विकासकामांचे उद्घाटन केले.
 
 
यामध्ये रापापूर, रोझवा, रांझणी, प्रतापपूर रस्ता व दोन वर्षासाठी देखभाल व दुरुस्ती करणे (193.31 लक्ष), गव्हाळी मोरंबा रायसिंगपूर रस्ता दोन वर्षासाठी देखभाल व दुरुस्ती करणे (163.50 लक्ष), आमलाड धानोरा वैजाली रस्त्याची सुधारणा करणे (350.00 लक्ष), मोरवड खरवड रस्ता ग्रा.मा 25 रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे (226.00 लक्ष), मोड खरवड रस्त्यापासून मोड बोरद जोड रस्ता बांधणे (75.00 लक्ष), आमलाड मोड बोरद रस्ता रामा. 1 रस्ता व दोन वर्षासाठी देखभाल व दुरुस्ती करणे (31.36 लक्ष), बोरद येथे धान्य गोदामासाठी संरक्षण भिंत बांधणे (41.10 लक्ष), तळोदा येथे धान्य गोदामासाठी संरक्षण भिंत बांधणे (28.24 लक्ष), तालुका लघुपशुसंवर्धन चिकित्सालय, तळोदा येथे आवार भिंत बांधणे (113.28 लक्ष) असे एकूण 12 कोटी 21 लाख रुपयांचे विकासकामांचे उद्घाटन शुक्रवारी 2 नोव्हेंबरला आ. उदेसिंग पाडवी यांचा हस्ते अंतर्गत करण्यात आले.
 
 
यावेळी, तळोदा नपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अजय परदेशी, नितीन पाडवी, भाजपाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र राजपूत, शहरध्यक्ष हेमलाल मगरे, युवा मोर्चाचे शिरीष माळी, नगरसेवक भास्कर मराठे, डॉ रामराव आघाडे, अनुप उदासी, प्रदीप शेंडे, संजीव चौधरी, संजय कलाल, प्रसाद बैकर, सुरेंद्र पाडवी. ठेकेदार राजेश मोरे, राकेश पाटील, रमेश भोई, चुडामन मराठे, पिनू भवर, बांधकाम विभागाचे पी.जी वळवी, नितीन वसावे, रितेश पाडवी, अजित वसावे, जे.बी वळवी आदी उपस्थित होते.
मोड येथील सभेत बोलताना आ. पाडवी म्हणाले की, मागचे सरकार किती सकारात्मक होते, याचे उदाहरण तुम्ही पाहत आहेत. मागच्या सरकारने 3 वेळा मोड खरवड पुलाचे नारळ फोडले, ढोल वाजविले पण प्रत्यक्षात मात्र काम नाही. आम्ही पहिल्यांदा निधी मंजूर करतो नंतर ढोल वाजवतो.
 
 
काँग्रेसने आजपर्यंत किती कोटीमध्ये निधी दिला? आता विद्यमान सरकारने 2 कोटी 26 लाख रुपये मोड-खरवड पुलासाठी दिले. आता पाचवं नारळ फुटणार नाही, तातडीने पुलाचे काम सुरू करण्यात येईल व वर्षभरात पुलाचे काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन आ. पाडवी यांनी सभेत बोलताना दिले.
@@AUTHORINFO_V1@@