होळ येथील नेव्हीतील जवानाचा अपघाती मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |

 
 
शिंदखेडा - तालुक्यातील होळ येथील मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेला निलेश नारायण पाटील (वय 27) हा जवान जहाजावर सिबु बेटाजवळ मर्चंट नेव्हीत कार्यरत होता. त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असताना विद्युत शॉक लागल्याने जागीच नीलेशचा मृत्यू झाला.
 
 
निलेश पाटील हा गेल्या वर्षीच दिल्लीत नेव्हीमध्ये भरती झाला होता. सहा महिन्यांपूर्वीच त्याची ड्यूटी जहाजावर झाली होती. निलेशच्या मृत्यूची बातमी घरातील कुटुंबीयांना कळल्यानंतर आई-वडिलांनी हंबरडा फोडला. निलेशच्या पश्चात दोन लहान भाऊ, आई-वडील असून घरची परिस्थिती हालाखीची आहे.
 
 
होळ येथील नारायण देवीदास पाटील (बच्छाव) यांचा निलेश हा मोठा अविवाहित मुलगा होता. निलेश हा प्रशिक्षण आटोपून सहा महिन्यांपूर्वी जहाजावर कार्यरत झाला होता. द व्हेटा कंपनी सिबू स्टेट मलेशिया येथून 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता मयत निलेशचा मृतदेह मुंबईत रात्री येणार आहे.
 
 
तेथून होळला सकाळी 8 वाजेपर्यंत निलेशवर होळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. निलेशच्या पश्चात वडील नारायण पाटील, आई लताबाई पाटील, भाऊ किशोर 12 वी आयटीआय झाला आहे. लहान भाऊ अमोल हा डिप्लोमा होऊन पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीला आहे.
@@AUTHORINFO_V1@@