पक्ष्यांची शिकार करणार्‍या 11 जणांना पकडले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2018
Total Views |

 
 
78 पक्ष्यांसह चार मोटारसायकली केल्या जप्त
 
नंदुरबार - जंगलात पक्ष्यांची शिकार करून मोटारसायकलीवरून पळ काढणार्‍या 11 जणांना वनविभागाच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून 78 मृत पक्षी व 7 जखमी पक्षी ताब्यात घेतले.
 
 
वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी चाकळे ढंढाणे रस्त्यावर 30 ऑक्टोबरला रात्री 11 वाजून 23 मिनिटांनी गस्त घालत होते. त्यावेळी चार मोटारसायकलींवरून 11 जण भरधाव वेगाने जात होते. वनविभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यांचा पाठलाग केला, त्यानंतर त्यांना अडवले. त्यांच्याकडे जवळपास 78 मृत पक्षी आढळले. तसेच 7 पक्षी जखमी असल्याचे निदर्शनास आले
 
 
. मृत पक्ष्यांमध्ये लावरी, पारवा, तितर, जंगली चिमणी या पक्ष्यांचा समावेश आहे. आरोपी हे सर्व नंदुरबार तालुक्यातील सोनगीरपाडा व वाघाळे या गावातील आहेत. याप्रकरणी हरिश्चंद्र ताराचंद बागुल (वय 25), राजेश महादू जगताप, सुनील मनिलाल भोये ( 28), राजेश धरम भोये (32), धन्या लोशा कोकणी (27), धरमदास टेट्या भोये (40), गजानान कनिलाल गावीत (35) सर्व रा.सोनगीरपाडा ता.नंदुरबार तसेच रोहिदास हरी कोकणी (26), धनराज गावीत (32), कविदास कोकणी (22), सुनील अवशा चौरे (20) रा.वाघाळे आदी 11 आरोपींना ताब्यात घेतले आहे.
 
 
त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.या गुन्ह्यात आरोपींना तीन ते सात वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. तसेच 25 हजार ते 50 लाखांच्या दंडाची तरतूद आहे. सहायक वनरक्षक जी. आर. रणदिवे, वनक्षेत्रपाल एम. के. रघुवंशी, एस. एम. पाटील, वनपाल पी. एल. नगराळे, वनरक्षक भूपेंद्र तांबोळी, वनरक्षक कल्पेश अहिरे, वनरक्षक प्रतिभा यांनी ही कारवाई केली.
@@AUTHORINFO_V1@@