श्रीपाद छिंदम अहमदनगरमधून तडीपार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2018
Total Views |

 

 
 
 
 
अहमदनगर : महाराष्ट्राचे आराध्यदैवत, जाणताराजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम याला अहमदनगरमधून तडीपार करण्यात आले आहे. अहमदनगरच्या उपविभागीय दंडाधिकारी उज्वला गाडेकर यांनी हा आदेश दिला. श्रीपाद छिंदम हा महापालिका निवडणुकीतील अपक्ष उमेदवार आहे. श्रीपाद छिंदमसह आणखी पाच जणांवरही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.
 

निवडणुकीच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये. यासाठी कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कँप पोलीसांनी अहमदनगरमधील आजी, माजी आमदार, गुन्हे दाखल असलेले राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांना तडीपार करण्यात यावे, असा प्रस्ताव दाखल केला आहे. पोलीसांनी दाखल केलेल्या या प्रस्तावावर थोड्या थोड्या कालावधीच्या अंतराने सुनावणी करण्यात येईल.

 

श्रीपाद छिंदमसोबत ओंकार कराळे, भाऊसाहेब कराळे, मनोज कराळे आणि दिपक खैरे या पाच जणांना निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत शहरातून तडीपार करण्यात यावे, असा आदेश देण्यात आला आहे. १५ दिवसांसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी महापालिकेच्या निवडणुक काळातही श्रीपाद छिंदमला तडीपार करण्यात आले होते.

 
शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचा मुलगा विक्रम राठोड तसेच भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचा मुलगा सुव्रेंद्र गांधी, राष्ट्रवादीचे उमेदवार कुमार वाकळे, संजीव भोर आणि १४ जणांना काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींवर त्यांना शहरात राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. ५० हजार रुपयांचा जातमचुलका, चांगल्या वर्तणुकीची हमी आणि रोज पोलीस ठाण्यात हजेरी ही बंधने त्यांना घालण्यात आली आहेत.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@