मानवी जीवनाची किंमत : इंग्लिस इष्टाईल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



ब्रिटिश लष्करी इतिहासात ‘पास आंदाल’ हे अपयशाचं, निराशेचं प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे. या ‘पास आंदाल’चीच कथा इथे सांगायची आहे.

 

सम्राट अशोक हा चंद्रगुप्त मौर्याचा नातू. कलिंग देश जिंकण्यासाठी झालेल्या युद्धात किमान दहा लाख सैनिक कामास आले. रक्तामांसाचा तो चिखल पाहून अशोकाला कमालीचं दु:ख झालं. त्याच्या जीवनातला तो परिवर्तनाचा क्षण ठरला. पुढे आयुष्यभर त्याने शांती आणि अहिंसेचा संदेश जगभर सर्वत्र प्रसारित केला. अशोकाची ही गोष्ट मुसलमान सुलतानांना समजली असती, तर ते खो खो हसले असते. कारण, माणसं मारणं हा त्यांचा अत्यंत आवडता छंद होता. आधुनिक काळात मुसलमानांचा हा वारसा साम्यवाद्यांनी उचलला. स्टालिनने आपल्याच एक कोटी देशबांधवांची कत्तल केली. हा आकडा त्याने स्वत:च्या तोंडाने चर्चिलला सांगितला. स्टालिन व चर्चिल यांच्या या भेटीनंतर स्टालिन आणखी दहा-बारा वर्षे हयात होता. त्या अवधीत आणखी किती माणसं त्याने मारली कुणास ठाऊक! १ ऑक्टोबर, १९४९ या दिवशी चीनमध्ये चँग कै शेकचं राष्ट्रवादी सरकार उलथून जनरल माओ त्से तुंगची साम्यवादी राजवट आली. असं म्हणतात की, ट्रक्स भरभरून माणसं निर्जनस्थानी नेली जात आणि त्यांना गोळ्या घालण्यात येत. अशी किती लाख माणसं मेली असतील याचा पत्ता नाही. १९५८ ते १९६२ या कालावधीत माओने 'द ग्रेट लीप फॉर्वर्ड’ हा महत्त्वाकांक्षी आर्थिक कार्यक्रम राबवला. त्यात किमान तीन कोटी चिनी नागरिक भुकेने तडफडून मेले. १९७५ मध्ये हुई या नदीवर बांधलेली दोन धरणं फुटली आणि किमान एक लाख लोक मेले. पण, चीन सरकार, असा काही अपघात घडला होता याचीच मुळी कबुली देत नाही.

 

मध्ययुगातल्या जुलमी आणि अनियंत्रित सामंतशाहीत माणसाच्या जीवाला किड्यामुंग्यांइतकीदेखील किंमत नव्हती, असं आपण ऐकतो. आधुनिक काळात ही स्थिती बदलल्याचा डंका प्रचारमाध्यमं पिटत असतात. पण, मग वरील घटनांचं काय? त्या तर अगदी याच शतकात घडलेल्या आहेत. मुसलमानांपेक्षा साम्यवादी बरे; साम्यवाद्यांपेक्षा नाझी बरे आणि या तिघांच्याही तुलनेत इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका म्हणजे अगदी देवदूतच; अशी आपली एक समजूत अर्थातच गैर-दृढ झालेली असते. प्रत्यक्षात निरपराधांच्या अमानुष कत्तलींनी सिद्ध केलंच आहे की, इंग्लंडही यात मागे नाही. पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धात ब्रिटिश सैन्यातल्या भारतीय जवानांना 'कॅनन फॉडर' म्हणून वापरून घेण्यात आलं. म्हणजे, अनोळखी, अवघड ठिकाणी आगेकूच करतेवेळी भारतीय पथकाला पुढे पाठविण्यात येई. त्यांनी मार्ग निष्कंटक केल्यावर मग ब्रिटिश जवान पुढे सरसावून काय तो पराक्रम गाजवत. भारतीय जवानांच्या प्राणाबद्दल ब्रिटिशांनी पर्वा केली नाही तर तेही एक वेळ समजण्यासारखं आहे. बोलून-चालून गुलामच ते; पण पहिल्या महायुद्ध काळात सेनापतींच्या दिशाहीन धोरणामुळे तब्बल अडीच लाख ब्रिटिश सैनिक ठार झाले होते. या मोहिमेला 'फ्लँडर्स' किंवा 'पास आंदालची मोहीम' असं नाव आहे. ब्रिटिश लष्करी इतिहासात 'पास आंदाल' हे अपयशाचं, निराशेचं प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे. या 'पास आंदाल'चीच कथा इथे सांगायची आहे. १९१७ साली जर्मन पाणबुड्यांनी ब्रिटिश आरमारी गोटात हाहाकार उडवला होता. रशियात राज्यक्रांती होऊन जर्मनी आणि रशिया यांच्यात युद्धबंदी झाल्यामुळे फार मोठी जर्मन सेना पश्चिमेकडे अँग्लो-फ्रेंचांवर घसरायला मोकळी झालेली होती. शिवाय जर्मन पाणबुड्या दर महिन्याला लक्षावधी टन वजनाची ब्रिटिश जहाजं बुडवत सुटल्या होत्या. नौदलप्रमुख अॅडमिरल जॉन जेलिकोने गंभीर सूचना केली की, ऑस्टेंड आणि झीब्रग ही बेल्जियम बंदरं आपल्या ताब्यात आणून जर्मन पाणबुड्यांना पायबंद न घातल्यास पुढच्या वर्षी युद्ध चालवणं आपल्याला अशक्य आहे.

 

 
 

या दोन बंदरांकडे जाणाच्या रस्त्यावर आल्प्सपासून थेट ब्रिटिश खाडीपर्यंत जर्मन फळी उभी होती. 'फ्लँडर्स' ही या फळीची डावी बाजू किंवा लष्करी भाषेत डावी बगल होती. या डाव्या बगलेवर धडक मारून ऑस्टेंड आणि झीब्रग काबीज करायची, जर्मन पाणबुड्यांना पायबंद घालायचा आणि भावी मोठ्या चढाईसाठी आपले मोर्चे मजबूत करायचे, असा डाव ब्रिटिश सेनापती जनरल अलेक्झांडर हेगने आखला. मात्र, त्यापूर्वी 'फ्लँडर्स'च्या प्रदेशाची पुरेशी माहिती हेगने घेतली नसावी, असं वाटतं. कारण, 'फ्लँडर्स' हा प्रदेश म्हणजे शुद्ध नरक. समुद्रसपाटीच्या खाली असल्याने तो कमालीचा सपाट आहे. इथल्या नद्या, ओढ्यांचं पाणी समुद्रात वाहून न जाता तिथल्या तिथेच सर्वत्र पसरत राही. परिणामी, 'फ्लँडर्स' म्हणजे दलदलीचा प्रदेश होता. स्थानिक बेल्जियन शेतकर्‍यांनी खूप मेहनतीने गटारं, कालवे काढून तिथे लागवडयोग्य भूमी निर्माण केली होती. पण, युद्ध सुरू झाल्यावर तोफांच्या मार्‍याने कालवे फुटले आणि पुन्हा सर्वत्र चिखल आणि दलदलीचं साम्राज्य पसरलं. अशा या भूमीवरून ब्रिटिश सैन्य मजबूत अशा जर्मन फळीवर चाल करून जाणार होतं. चर्चिल यावेळी मंत्रिमंडळात नव्हता. त्याने पंतप्रधान लॉईड जॉर्जला पत्र लिहून 'फ्लँडर्स' ही काय चीज आहे, याची कल्पना दिली. पण, त्याचा काहीही उपयोग न होता ३१ जुलै, १९१७ या दिवशी ब्रिटिश चढाई सुरू झाली. त्याच दिवशी संध्याकाळी तुफान पाऊस सुरू झाला. तोफांच्या मार्‍यामुळे पडलेले मोठमोठे खड्डे पाण्याने भरून गेले. सगळीकडे नुसता रबरबाट झाला. इंच इंच भूमीसाठी लढत ब्रिटिश फौजा पुढे सरकत होत्या. ४ ऑक्टोबरला ब्रिटिशांनी इप्र टेकड्या जिंकल्या. दोन महिन्यांनंतर झालेली ही प्रगती फारच किरकोळ होती आणि त्यासाठी मोजावी लागलेली माणसांची किंमत फारच जबर होती.

 

'फ्लँडर्स'चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथली माती शाडूची आहे, त्यामुळे चिखल डिंकासारखा चिकट होतो. या चिखलात रुतून हजारो सैनिक, घोडी आणि खेचरं मरू लागली. पण, जनरल हेगने चढाईचाच हुकूम दिला. युद्धकचेरीत बसून हुकूम सोडायला हेगचं काय जात होतं? चार महिन्यांनंतर म्हणजे ऑक्टोबरमध्ये हेगचा चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल किगेल याने, 'फ्लँडर्स'ला भेट दिली. तिथली प्रत्यक्ष स्थिती पाहून तो कमालीचा अस्वस्थ झाला. मोटार जसजशी दलदलीच्या काठावर येऊ लागली, तसतसा आजूबाजूच्या आपल्याच सैन्याचा भीषण संहार पाहून त्याची बेचैनी वाढतच गेली आणि प्रत्यक्ष दलदल सुरू झाली तेव्हा तर त्याला अश्रू आवरेनात. 'पास आंदाल'च्या या निरर्थक कत्तलखान्याबद्दल कमालीच्या विषादाने चर्चिल लिहितो,” थोड्याच अवधीत पाऊस सुरू झाला आणि प्रचंड खड्ड्यांनी भरलेलं ते रणक्षेत्र म्हणजे जीव गुदमरवणार्‍या दुर्गंधीयुक्त चिखलाचा समुद्र बनला. त्या समुद्रात रणगाडे, सैनिक आणि जनावरं कोसळली व हताशपणे नष्ट झाली. त्या दलदलीत हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढेच रस्ते होते. तोफांच्या अखंड भडिमारामुळे ते नुसते भाजून निघत होते आणि तशातूनच वाहनांचे थवे धैर्याने पुढे सरकत होते.” या धैर्याचा अर्थात काहीही उपयोग नव्हता. ऑस्टेंड आणि झीब्रग बंदरं पार लांब राहिली आणि नोव्हेंबरात जनरल हेगला मोहीम गुंडाळावीच लागली. त्याच्या पदरात फक्त 'पास आंदाल' टेकड्यांपर्यंतचा मुलुख पडला. या मोहिमेसाठी हेगने प्रचंड तयारी केली. ३१ जुलै ते १० नोव्हेंबरपर्यंत चाललेल्या या अर्थशून्य युद्धात ब्रिटिशांची २ लक्ष, ४० हजार आणि फ्रेंचांची ८ हजार, ५०० एवढी माणसं अक्षरशः फुकट मेली. या आकड्यांवरून लक्षात येईल की, 'फ्लँडर्स' ही मुख्यत: ब्रिटिश मोहीम होती. फ्रेंचांचा वाटा त्यात फारच अल्प होता आणि म्हणूनच आपण एकट्यानेच ही मोहीम यशस्वी करून श्रेय घ्यायचं, असा जनरल हेगचा बेत होता. पहिल्या एका महिन्यातच ६७ हजार ब्रिटिश सैनिक ठार झाल्यावर पंतप्रधान लॉईड जॉर्जने हेगला बोलावून ही मोहीम महाग पडत असल्याचं मत व्यक्त केलं होतं. पण, हेगने लष्करी हेरखात्याकडून जर्मन सेना माघार घेण्याच्या मन:स्थितीत असल्याच्या वार्ता आल्याचं सांगून चढाई चालू ठेवण्याची परवानगी मिळवली. ही सरळ सरळ दिशाभूल होती. कारण, प्रत्यक्षात जर्मन सेनानी एरिक लुडेंडॉर्फने रशियन आघाडीवरील रिगा बंदर काबीज करण्याची तयारी चालवली होती. शिवाय आठ ते दहा जर्मन डिव्हिजन्स इटालियन आघाडीवर रवाना करण्याचाही त्याचा विचार चालू होता. म्हणजेच जनरल हेग या एका सेनापतीच्या अहंकारामुळे, अतिरिक्त महत्त्वाकांक्षेमुळे किमान अडीच लाख माणसं फुकट मेली. याचाच अर्थ असा की, माओ आणि जनरल हेग यांच्या प्रवृत्तीत फारसा फरक नाही. माओ अनियंत्रित सत्ताधीश असल्यामुळे तीन कोटी माणसं मेली. हेगवर मंत्रिमंडळाचे नियंत्रण असल्यामुळे अडीच लाखांवर भागलं. इतिहासाने असंख्य क्रूरकर्मे पाहिले आहेत. शत्रूच्या सैनिकांची, नागरिकांची, स्त्रियांची, मुलांची आणि वृद्धांची कत्तल करण्यात ज्यांना मनापासून आनंद होईल, असे अनेक 'वीर' तुर्कांच्या आणि पोर्तुगीजांच्या राजवटीत होऊन गेले. पण, आपल्याच देशबांधवांची कत्तल करण्यात ज्यांना आनंद वाटे, अशांना कोणतं विशेषण लावणार? त्यांच्या मनोव्यापाराचं विश्लेषण, पृथक्करण करणं हे खरोखरच मोठं आव्हानात्मक आहे.


 
 

हिमयुग येतंय? नाश होतो. म्हणजे असं की, अवकाशातल्या धूमकेतूचे ढग सूर्याला झाकून टाकतात. काही धूमकेतू पृथ्वीवरही आदळतात. यामुळे हिमयुग निर्माण होतं आणि सारं जीवन नष्ट होतं. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या दोघा तज्ज्ञांनाही हे २६ दशलक्ष वर्षांचं चक्र मान्य आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार इतर सर्व तार्‍यांप्रमाणे सूर्यालाही एक सहोदर तारा आहे. पण, सूर्यमालेच्या भ्रमणकक्षेच्या तो खूपच पलीकडे असल्यामुळे त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेलेलं नाही. दर २६ दशलक्ष वर्षांनी तो सूर्यमालेमधून जातो आणि त्यावेळी या सर्व घटना घडतात. काही शास्त्रज्ञांच्या मते, सूर्यमालेचं हे भ्रमणचक्र २६ दशलक्ष वर्षांचं नसून ३० दशलक्ष वर्षांचं आहे. दर ३० दशलक्ष वर्षांनी धूमकेतूच्या ढगांचा सर्वच ग्रहांशी संबंध येतो. यातले काही धूमकेतू अतिविशाल आहेत. सूर्यमालेच्या आंतरभागात ते फुटतात व त्याचे उल्का, लघुग्रह आणि मातीत परिवर्तन होतं. यामुळे सूर्य झाकला जातो आणि हिमयुग अवतरतं. किती काळ? दहा हजार वर्ष! एवढ्या प्रदीर्घ हिमयुग काळात जीवन अस्तित्वात राहणं शक्यच नसतं. आपण हे सगळे लक्ष, दशलक्ष वगैरे आकडे वाचायचे आणि भुवया उंचावयाच्या. बाकी आपल्या हातात काहीच नाही. सध्या सर्वसामान्य माणसाचं दैनंदिन आयुष्य धकाधकीचं बनलं आहे. पण यावरून आपल्याला भारतीय कालगणनेच्या शास्त्रीयतेबद्दल काही संदर्भ मिळतात. हिंदू कालगणनेनुसार सध्या कलियुग सुरू आहे. या सत्य, त्रेता, द्वापार आणि कलि अशा चार युगांचं मिळून एक युगचक्र कित्येक दशलक्ष वर्षांचं बनतं. युगचक्राच्या शेवटी प्रलय होतो आणि मग नव्या सृष्टीरचनेला प्रारंभ होतो. सध्याचं युगचक्र हे सातवं आहे. सात चोक अठ्ठावीस. पंढरपूरच्या विठोबाची आरती करताना नामदेव 'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा' म्हणतात, त्याचा काहीतरी संदर्भ यातून मिळतो.

 

या सगळ्याशी सुसंगत अशी बातमी पुन्हा अमेरिकेतूनच आली आहे. अमेरिकन हवामान खात्याने अध्यक्षांना अहवाल पाठवला आहे की, चालू नोव्हेंबर ते पुढच्या मार्चपर्यंतच्या कालावधीत महाभयानक थंडीचा कडाका पडण्याची शक्यता आहे. तातडीने उपाययोजना न झाल्यास हजारो माणसं थंडीने काकडून मरण्याची शक्यता आहे. हिमवर्षावाने दोन ते अकरा फुटांचा बर्फाचा थर साचेल, यापूर्वी कधीही झालं नव्हतं असं जबरदस्त हिमवादळ होईल, गारांचा पाऊस, अतिवृष्टी आणि त्यातून निर्माण झालेली थंडीची लाट यामुळे अनेक शहरं गोठून जातील, असं भाकीत हवामान खात्याने वर्तवलं आहे. हे सगळं वाचून भीतीची थंड लहर तुमच्या अंगात पसरली असेल, तर एक सोपी गोष्ट करायची. मुंबईच्या कोणत्याही रस्त्यावर चालायला सुरुवात करायची. पाझरणार्‍या घामाच्या प्रवाहाबरोबर भीती पळून जाईल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@