लोकल ट्रेनमध्ये चढताना होणारी गर्दी, त्यामुळे होणारे वादविवाद, धक्काबुक्की, अपघात यासगळ्यापासून १५ डब्यांच्या लोकल ट्रेनमुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. लोकल ट्रेनचे डबे वाढविल्याने मुंबईतील रेल्वेची कार्यक्षमता २५ टक्क्यांनी सुधारू शकते. असे पीयुष गोयल म्हणाले. सर्वप्रथम मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल गाड्या धावतील. यानंतर धीम्या मार्गावरही १५ डब्याच्या लोकल गाड्या सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशी माहिती रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी दिली.
पश्चिम रेल्वेवरील १२ डब्याच्या लोकल ट्रेनची क्षमता ही तीन हजार प्रवाशी वाहून नेण्याची आहे. परंतु गर्दीच्या वेळी या लोकल ट्रेनमधून ५,५०० पेक्षा अधिक प्रवाशी प्रवास करतात. गर्दीच्या वेळी रेल्वे डब्यात एका स्क्वेअर मीटरमध्ये तब्बल १६ प्रवासी प्रवास करतात. असे रेल्वेच्या लक्षात आले आहे. १५ डब्याच्या लोकल ट्रेनची वाहनक्षमता ४,२०० इतकी आहे. या गाड्यांमधून सुमारे ७ हजार प्रवासी गर्दीच्यावेळी प्रवास करू शकतील. असा अंदाज रेल्वेकडून वर्तविण्यात येत आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/