
मुंबई : विदर्भासह कोकणातील सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराला तत्कालीन सरकारच्या खात्याचे मंत्री म्हणून माजी जलसंपदामंत्री अजित पवार जबाबदार ठरतात, असे प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मंगळवारी सादर केले.
या प्रकरणामुळे अजित पवार यांना चौकशीला सामोरे जावे लागण्याची शक्यता असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या वादात उडी घेतली आहे. भुजबळ यांनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रतिज्ञापत्र सादर करुन भाजप त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मोठा राजकीय भूकंप होणार ?
दरम्यान नागपूर खंडपीठात लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सादर केलेल्या परीपत्राकानुसार अजित पवारच या घोटाळ्याला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. आत्तापर्यंत संबंधत अधिकारी आणि कंत्राटदारांवरच कारवाई झाली. या पतिज्ञापत्रामुळे पवारांचा पाय खोलात अडकण्याची चिन्हे आहे. कारवाई झाल्यास मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तूळात सध्या आहे.
नेमके आरोप काय ?
सिंचन प्रकल्पांना तांत्रिकदृष्ट्या मंजुरी मिळण्यापूर्वीच निविदा मागवणे अपात्र कंत्राटदार व संयुक्त उपक्रम कंपन्यांना निविदा जारी करणे, खोटे प्रमाणपत्र सादर करणा-या कंत्राटदारांना कंत्राट वाटप, निर्धारित प्रक्रियेचे उल्लंघन करणे, सरकारच्या हिताविरुद्ध निर्णय, निवडक कंत्राटदारांना आर्थिक व विविध प्रकारचा फायदा करून देणे, दर्जाहीन कामे, अशा प्रकारे सिंचन प्रकल्पांमध्ये अनियमितता झाल्याची माहितीही प्रतिज्ञापत्रात सादर करण्यात आली आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/