26 / 11 हल्ल्याची दशकपुर्ती

    26-Nov-2018
Total Views |
 
26 / 11 हल्ल्याची दशकपुर्ती
 
जळगाव, 22 नोव्हेंबर
26 नोव्हेंबर 2008 ला मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची दशकपुर्ती आज होत आहे. या हल्ल्यात 197 नागरिक ठार झाले. 292 नागरिक जखमी झाले. यात 17 सुरक्षा कर्मचारी आणि 34 परदेशी नागरिकांचा समावेश होता. या हल्ल्या नंतर भारताच्या सुरक्षा व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. परंतु या 10 वर्षाच्या कालखंडात विशेष करुन मागील 4 वर्षांत अपवाद वगळता देशात आतंकावादी हल्ला होवू शकला नाही.
26 नोव्हेंबर रोजी 10 तरुण सागरी मार्गे मुंबई दाखल झाले. या हल्ल्यापुर्वी मुंबईमध्ये अशा प्रकारचे हल्ले झाले नव्हते. पण बॉम्बस्फोट झाले होते. सागरी मार्गे दशहतवादी मुंबई घुसल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणा , सागरी सुरक्षा आणि गृहविभागावर ताशेरे ओढले जाणे स्वाभाविक होते. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री हे वारंवार कपडे बदलविण्यामुळे प्रसिध्दी झोतात आले होते. केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे गृहमंत्र्यांना टिकेचे धनी व्हावे लागले आणि पदत्याग करावा लागला होता.
 
सुरक्षा यंत्रणेने  9 आतंकवाद्यांना यमसदनी पाठवले आणि एकास जिवंत पकडण्यात यश मिळविले.
सर्व पुरावे गोळा करण्यात आले आणि कसाब हा पाकिस्थानी नागरिक असल्याचे सिध्द झाले. तो पर्यंत या हल्ल्याबाबत विविध चर्चा देशभरात विविध विचारधारांकडून सुरु होत्या. कसाब हा पाकिस्थानी असल्याचे सिध्द झाल्या नंतर या सर्व चर्चांना विराम मिळाला होता.
केंद्र सरकारने नेहमी प्रमाणे आतंकवादी हल्ल्याची कठारे निंदा केली होती. इस्त्राईल सरकार आणि मोसादने भारत सरकारला या प्रकरणी मदत देण्याचा प्रयत्न केला होता आणि तो तत्कालिन भारत सरकारने नाकारला असल्याचे कळते.या घटने नंतर पाश्चिमात्य देशांनी त्यांच्या नागरिकांना परत देशात येण्याचे आवाहन केले. याचा परिणाम शेअर बाजारावर झाला. तसेच भारत इंग्लँड क्रिकेट मालिकेवर सुध्दा झाला.अफवांचे पेव देशात मोठया प्रमाणात फुटले होते.
 
मीडियाचा अतिउत्साह
आतंकवादी मुंबईतिल नामांकित हॉटेल्समध्ये घुसून गोळीबार करत होते याचे थेट प्रक्षेपण अनेक वृत्तवाहिन्यांनी केले. आतंकवादी ही आधुनिक शस्त्रसज्ज होते. वृत्तवाहिन्यांवर सैन्याच्या कारवाईचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आल्याने दशहतवाद्यांचा खातमा करण्यास विलंब होत होता. आपल्या वृत्तवाहिनीचा टिआरपी वाढविण्यासाठी वाहिन्यांचे प्रतिनिधी जीव धोक्यात घालून वार्तांकन करत होते त्यामुळे हॉटेल्स बाहेरिल स्थितीची थेट माहिती आतंकवाद्यांपर्यत पोहचत होती. माध्यमांनी घटनांचे प्रसारण करावे परंतु काही वेळा देशहितासाठी आणि शत्रुला लाभ होणार नाही म्हणून अतिउत्साहत कोणत्याही घटनांचे थेट प्रक्षेपण करु नये अशी चर्चा जनसामान्यात होवू लागली होती.
 
या हल्ल्या नंतर गृहविभागातील कमजोर बाजू समोर आली . पोलीसांन अद्यावत शस्त्रे व बुलेटप्रुफ जॅकेट उपलब्ध करण्याची मागणी जोर धरु लगली होती. दहशतवाद विरोधी नविन केंद्रीय संस्था उभारण्यासाठी सर्वानुमते मान्यता मिळाली. नोव्हेंबर 2008 पासून नोव्हेंबर 2012 पर्यंत अजमल कसाब याला तरुंगात ठेवण्यात आले. नैसर्गिक न्याय तत्वाच्या आधारे त्याला त्याची बाजू मांडण्याचा अधिकार देण्यात आला. यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा उजळली मात्र कोटयावधी रुपयांचा चुराडा झाला. 21 नोव्हेंबर 2012 रोजी अजमल कसाब यास फाशी देण्यात आली.
 
2014 रोजी केंद्रात सत्तांतर झाले. आणि सुरक्षा यंत्रणेत सरकारने अग्रीम बदल केले. भारताची मवाळ भूमिका बदलून आक्रामक भूमिका समोर आली. आतंकवादी हल्ल्याचा केवळ निषेध न करता बदला घेण्याची भ्ूमिका केंद्र सरकारने घेतली यामुळे सर्जिकल स्ट्राईक घडले. ज्या मोसादची मदत तत्कालीन केंद्र सरकारने नाकारली होती. त्या इस्त्राईल देशात मोदी यांनी जावून भारताच्या स्वातंत्र्या नंतर पहिले पंतप्रधान या देशात जाण्याचा मान प्राप्त केला. इस्त्राईल सोबत मैत्रीपुर्ण संबध अधिक दृढ केले. सुरक्षा आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत आज इस्त्राईलची लाखमोलाची मदत भारताला होत आहे.
आतंकवाद्यांना दया न दाखवता कठोर प्रतिउत्तर देण्याची भूमिका मोदी सरकारने घेतली त्यामुळे गेल्या साडेचार वर्षात या महिन्यातील पंजाब मधील ग्रेनाईड हल्ला वगळता देशात आतंकवादी हल्ले होऊ शकले नाही. सुरक्षेच्याबाबतीत सैन्याच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आणि अत्याधुनिक शस्त्रे व तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यात आले . फलस्वरुप भारताच्या सीमेत घुसखोरी केलेल्या आतंवाद्यांचे आयुष्य दोन महिन्यांपेक्षा अधिक नसते. भारत बांग्लादेश सीमा प्रथमच निश्चीत करण्यात आली.
 
 
राज्य सरकारने पोलीसांना अद्यावत शस्त्रे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. गुप्तचर यंत्रणा अधिकाधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला. मुंबई ही कायम दहशतीखाली असायची परंतु या 4 वर्षांपासून मुंबईकर भीतीमुक्त जगत आहेत.केंद्र सरकारने दुरदूष्टी ठेवून भारतात घुसखोरी करणारे रोहिंग्यांना सीमेवरच अटकाव केला.आसाममध्ये घुसखोरांना शोधून काढण्यात आले. ही किमया या 4 वर्षात घडली आहे.
26 नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्या नंतर भारतीयांनी आतंकवादाची जी दहशत अनुभवली आणि दहशतवादाचे काळे ढग जे भारताच्या आकाशात दिसत होते ते या 4 वर्षात नाहिसे झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
 
 
भरकटलेले राजकारण
गेल्या 10 वर्षात आणि त्यातील मागील 4 वर्षांचा राजकारणाचा अभ्यास केला असता. राजकारणाने हिन पातळी गाठली असून सर्जीकल स्ट्रईक सारख्या कारवायांचे पुरावे विरोधी पक्षाकडून मागण्यात आले. काही लोकांनी सर्जीकल स्ट्राईक फेक असल्याचे सांगुन सैनिकांनी गाजविलेल्या पराक्रमावरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले. सुदैवाने 26 नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्याच्यावेळी तत्कालीन विरोधकांनी राजकारणाची हिन पातळी गाठली नाही.
 
आतंकवाद्याशी लढणे सोपे पण शहरी नक्षलवादी भयंकर
साडेचार वर्षात भारतीय सैन्य आतंकवाद्यांच्या यशस्वीपणे मुकाबला करुन खातमा करत आहे. पण या दरम्यान शहरी नक्षलवादाने तोंड काढले आहे. बुध्दिजीवी म्हणवले जाणारे कथीथ समाजसुधारक मानवाधिकार या गोंडस नावाखाली दशहतवाद्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरतांना आपणास दिसून आले. बुध्दीभेद करुन दिशाभूल करणे हेच काम या लोकांचे असल्याचे प्रामुख्याने जाणवते.
आतंकवादी हे शत्रु राष्ट्राशी संबधीत असल्याने त्यांच्याशी सहज दोन दोन हात करता येतात परंतु शहरी नक्षलवाद हा प्रत्येक घरा पर्यंत पोहचला आहे. हे आपलेच भारतीय असून जगातुन नाहिसा होत असलेला माक्र्सवाद येथे प्रबळ करण्यासाठी धडपड करतांना दिसतात.

शहीद झालेल्या  प्रमुख व्यक्ती

प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांसह सतरा पोलिसांना वीरमरण आले.

तुकाराम ओंबळे - सहाय्यक उपनिरिक्षक, मुंबई पोलिस. यांनीच कसाबवर झडप घालून पकडून ठेवले व स्वत:चे प्राण गमावले.

 हेमंत करकरे - मुंबई दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी

अशोक कामटे - ऍडिशनल पोलिस कमिशनर

विजय साळसकर - एनकाउंटर स्पेशालिस्ट

       शशांक शिंदे - वरिष्ठ पोलिस निरिक्षक

मेजर संदीप उन्नीकृष्णन - एन.एस.जी. कमांडो अधिकारी

         हवालदार चंदर - एन.एस.जी. कमांडो

 हवालदार गजेंदर सिंह बिष्ट - एन.एस.जी. कमांडो

छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे तीन रेल्वे कर्मचारी गोळीबाराला बळी पडले.