पाचोरा :
येथील बालाजी रथोत्सवा निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीतील सर्व भाविक भक्तांसाठी मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडतर्फे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाणपोळी लावून करण्यात आलेली होती.
याप्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिपक पाटील, बापूसाहेब सोनार, नाना देवरे ,नगरसेवक विकास पाटील ,आकाश वाघ, लक्ष्मण सूर्यवंशी, पत्रकार प्रशांत येवले, प्रमोद पाटील, नंदु भाऊ शेलकर, अनिल येवले, राजेंद्र वाणी, राजेंद्र पाटील, अनिल मराठे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले .
यशस्वितेसाठी जिजाऊ ब्रिगेडच्या कमल कदम,योगिता पवार,कविता गोल्हार, विरभगत सिंह विद्यार्थीनी परिषदेच्या तालुकाध्यक्ष अमृता मराठे, मराठा सेवा संघाचे कार्यकर्ते व संभाजी ब्रिगेडच्या अनिल मराठे, राजू पाटील, गजमल पाटील, बंटी जगताप, सोनू पाटील, चेतन पाटील,दिपक पाटील, कन्हैया पाटील, दीपक शेवरे यांनी परिश्रम घेतले.