पाचोरा :
ईद-ए-मिलादनिमित्ताने येथे मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुस्लीम समाजाच्या मिरवणुकीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंडप टाकून पानपोई सुरू करण्यात आलेली होती.
यावेळी सदर ठिकाणी केशव पातोंड, उपविभागीय पोलीस अधीक्षक, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवश्री दीपक हरी पाटील, नगरसेवक विकास पाटील, वासू महाजन, अजहर खान, अल्लाउद्दीन शेठ, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, शहराध्यक्ष रवी देवरे, माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र सुकदेव पाटील, कार्याध्यक्ष मुकेश तुपे, सेवा संघाचे सचिव सुनील पाटील, एस.के.अण्णा पाटील, जिभाऊ पाटील, गजमल पाटील, विशाल धनगर, मनोज़ सोनार, मुजाहिद खान, सागर शेख, गोपाल महाजन, दादा आदिवाल, दीपक शेवरे, संजू बाबा, अनिल पांगरे, किरण पाटील, प्रशांत पाटील उपस्थित होते. यशस्विते साठी राजेंद्र पाटील, पप्पू जाधव, दीपक पाटील व एस. के. पाटील यांनी सहकार्य केले.